माझ्याकडे पाहण्याचा ‘तो’च दृष्टिकोन… 

दिल्ली : वृत्तसंस्था – खूप कमी वेळेत बॉलिवूड मध्ये सनी लिओनीने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. हीच सनी अनेक वेळा सोशल मीडियावर सतत कोणत्याना कोणत्या कारणाने ट्रोल होत असते.

अनेक वेळा अपमानजनक टिप्पणीला तिला सामोरे जावे लागले. सतत ट्रोल होण्याविषयी सनीने आपले मत मांडले आहे.

जेव्हा माझ्यावर भूतकाळातील कामाच्या आधारावर टीका केल्या जातात तेव्हा, मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो. असे सनीने म्हटले आहे. “मी नेहमीच नकारात्मक गोष्टींना बाजूला सारत असते. परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्यांना बाजूला करणे शक्य होत नाही.

मी पण माणूस आहे, मलाही भावना आहेत.” अश्या शब्दात तिने भावना व्यक्त केल्या.

काही गोष्टी फालतू आहेत हे माहिती असतानादेखील मीडिया वाढवून चढवून दाखवते. तेव्हा मला या सगळ्याचा त्रास होतो. अति वागणाऱ्या हिंसक समुहाला चर्चेत आणले नाही तर हे जग जगण्यासाठी सुंदर होईल.

“लोकांनी केलेल्या निंदेचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. कारण मला माहिती आहे की स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे.

ती पुढे म्हणाली, “प्रत्येक परिस्थिती वेगळी असते आणि मी नेहमी पत्रकारांना पडलेल्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यांनाही समान पध्दतीने अस्वस्थ करणे किंवा त्यांनाही कसे वाईट वाटेल हे मला कळत असते.

माझ्याकडे बोलल्या शिवाय स्वतःला सुरक्षित राखण्याचा दुसरा पर्याय नाही.”