Sunny Leone | बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री सनी लिओनीच्या (Actress Sunny Leone) नावाने फसवणूक (Fraud) होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिने स्वत:च चाहत्यांना याबाबत अलर्ट (Alert) केले आहे. सनीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एका इव्हेंटची माहिती दिली असून तिच्या नावाचा गैरवापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. (Sunny Leone)

 

ट्विट करून सनीने म्हटले आहे की, थाडलंडमध्ये (Thadland) एक इव्हेंट होणार असून माझ्या नावाचा वापर करुन स्कॅम होत आहे. यासाठी तिने चाहत्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तिने म्हटले आहे की, हे फेक असून अशा कोणत्याही फ्रॉडमध्ये अडकू नका, माझ्या नावाचा वापर केलेल्या इतर कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका.

 

तिने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी कोणत्याही प्रकारे या अवॉर्ड शोसोबत संबंधित नाही. या इव्हेंटच्या ऑर्गनायझर्सला माझ्या नावाचा वापर करण्याचा अधिकारही नाही. कृपया यात कोणीही अडकू नका.

सनी लिओनी (Sunny Leone) नेहमी सक्रिय असते. ती अनेकदा कुटुंबासोबतचे तिचे फोटो शेअर करत असते.
सनीने डेनियल वेबरशी (Daniel Weber) लग्न केले असून त्यांना निशा,
अशर आणि नोआहा अशी तीन मुले आहेत. सोशल मीडियावर इतर सेलिब्रिटींप्रमाणे सनीलाही अनेकदा ट्रोल केले जाते.
सनी एमएक्स प्लेयरच्या ’अनामिका’ (Anamika) या वेब सीरिजमध्ये (Web Series) दिसली होती.

 

Web Title :- Sunny Leone | sunny leone warns fans those organizers using her name for fake event in thailand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 1 लाख 62 हजारांची अफुची बोंडे (चुरा) जप्त

District Planning Committee (DPC) Pune | अजित पवारांना धक्का? पुणे जिल्हा नियोजन समितीवरील 18 सदस्यांचे पद रद्द

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…