सनी लिओनीनंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात होणार ‘या’ पॉर्न स्टारची एन्ट्री!

मुंबई: पोलीसनामा आॅनलाइन
सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बाॅस 12 च्या सीझनमध्ये  सनी लिअोनीनंतर एक नवीन पाॅर्न स्टार दिसण्याची शक्यता आहे. शांती डायनामाइट असे या पाॅर्न स्टारचे नाव आहे. शांती या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून बिग बाॅसच्या घरात प्रवेश करु शकते. सलमान खान सध्या ‘दस का दम’ हा टीव्ही शो होस्ट करतोय. यानंतर लवकरचं तो ‘बिग बॉस’चे नवे सीझन होस्ट करताना दिसणार आहे. ‘बिग बॉस’च्या या आगामी सीझनची म्हणजेच ‘बिग बॉस12’ची आत्तापासूनचं जोरदार चर्चा आहे.
मागील काही सीझनसाठी देखील शांतीचे नाव चर्चेत होते. परंतू ती केवळ अफवा निघाली. मात्र या सीझनमध्ये ती प्रवेश करण्याची शक्यता अधिक आहे. कारण यावेळेस बिग बाॅसच्या घरात अनेक वादग्रस्त जोड्या बघायला मिळणार आहेत. यापूर्वी पाॅर्न स्टार सनी लिअोनी बिग बाॅसच्या घरात दिसली होती. यानंतर ती अनेक कारणामुळे प्रकाशझोतात आली होती. एवढेच नाही तर बिग बाॅसच्या घरात पाहूणे म्हणून गेलेले दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सनीला त्यांचा चित्रपट आॅफर केला होता. यानंतर सनीने बाॅलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यामुळे सध्या सनी लिअोनी पाॅर्न स्टार नाही तर बाॅलिवूडची अभिनेत्री म्हणून अोळखली जाते.
बिग बाॅस 11 च्या सिझनचा टीआरपी फारसा चांगला नव्हाता. त्यामुळे आगामी 12 व्या सीझनमध्ये ही कसर भरुन काढण्यासाठी मेकर्सचे प्रयत्न असल्याचे कळते आहे. त्यामुळे बिग बाॅस चे आगामी सीझन कमालीचे बोल्ड असणार असल्याचे टेलीचक्कर ने वृत्त दिले आहे. शो अधिकाधिक बोल्ड बनवण्यासाठी या सीझनमध्ये स्पर्धेक जोड्याच्या रुपात बिग बाॅस च्या घरात दाखल होणार आहेत. यामध्ये वादग्रस्त स्पर्धकांना प्रवेश देण्याच्या विचार मेकर्स करत आहे.सासू सून, बाॅस सेक्रेटरी, वादग्रस्त पत्रकार यांना देखील प्रवेश असणार आहे. ‘बिग बॉस’च्या सूत्रांचे मानाल तर गे आणि लेस्बियन कपलही या घरात दिसू शकतात. एवढेच नाही तर अ‍ॅडल्ट स्टार किंवा स्ट्रीपर्सचाही शोध सुरु आहे. आता ही बातमी खरी ठरली तर ‘बिग बॉस’ चा 12 वे पर्व मात्र कमालीचे गरमा गरम दिसणार आहे.