‘या’ महिलेनं दिला सापाच्या मुलाला जन्म, मुलासारखं ‘पालन-पोषण’ करत असल्याचा दावा !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – जगभरात अनेक चित्र – विचित्र गोष्टी घडताना दिसतात. अनेक लोक पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. विशेषतः कुत्रा, मांजर, ससा घरी पाळाला जातो. त्याच्यावर आपल्या मुलासारखेच प्रेम केले जाते. परंतु, मुंगेर मध्ये एका महिलेने विषारी सापाच्या पिल्लांनाच आपला मुलगा – मुलगी मानले आहे. तसं समजून ती त्यांचा सांभाळ करत आहे. हि सापाची पिल्लेही त्या महिलेचं सर्व काम ऐकतात. यांच्याकडे पाहून गावकऱ्यांना आश्चर्य होत असते.

मीना कुमारी असे या महिलेचे नाव आहे. त्या कृष्णा यादव यांच्या पत्नी आहेत. जे कि मजूरी करतात. त्या मुंगेर मुख्यालयापासून चार किलोमीटरच्या अंतरावर डकरा गावामध्ये राहतात. विशेष म्हणजे, मीना कुमारी या एका विषारी सापाच्या पिल्लांना आपली मुलगी मानून त्याची खूप काळजी घेतात. सापाला घेऊन त्या घरातील सर्व कामं करतात. साप सुद्धा यांचं एका आज्ञाधारी मुलाप्रमाणे सर्वकाही ऐकत असतो.
Sneak
मीना कुमारी या दावा करतात कि, त्यांनी तीन सापाच्या पिल्ल्यांना जन्म दिला आहे. त्यापैकी दोन मुले तर एक मुलगी असल्याचे सांगतात. त्यांनी या आपल्या तिन्ही मुलांची नावेही ठेवली आहेत. एकाचे नाव आंधी , तुफान आणि मिनू अशी ठेवली आहेत. त्यापैकी आंधी आणि तुफान यांचा मृत्यू झाला असल्याचे त्या सांगतात. पण मिनू जिवंत आहे.

मीना देवी यांनी सांगितले कि, आधीच एक मुलगा आणि मुलगी आहे. परंतु दिवसभर मिनूला बघण्यासाठी दिवसभर लोकांचे घरी जाणे-येणे सुरूर असते. या सापाच्या पिल्लाला पाहून गाववाले आश्चर्यचकित होऊन जातात. या गोष्टींना विज्ञान मान्यता देत नाही परंतु हि महिला आपण यांना जन्म दिला असल्याचा दावा करतात. गाववाले मात्र आई- मुलगी यांचं प्रेम बघण्यासाठी घरी येत असतात.

गाववाल्यांनी हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांनाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. पण एका विषारी सापाच्या पिल्लाला मांडीवर खेळताना पाहून हे खरं मानू लागले. गाववाले सांगतात कि, हा साप या महिलेचं सर्व ऐकतो. मीना कुमारी सांगतात कि, ग्रामीण डॉक्टरांनी उपचार केला. अल्ट्रासाउंड केल्यानंतर डॉक्टर म्हणाले तुमच्या पोटात एक पिशवी आहे. बाळ दिसत नाहीये. त्या म्हणाल्या कि, मी जेव्हा गरोदर होते तेव्हा काही जरी खाल्ले कि, पोटात आग पडत असे आणि दूध पिलं तर बरं वाटत असे.
Sneak
गरोदर असल्याच्या ९ महिन्यानंतर पोटात त्रास झाला. बाथरूमला गेले तेव्हा काही तरी बाहेर निघाले असे वाटले. मला वाटले कि, मी एखाद्या मुलाला जन्म दिला आहे. परंतु अंधार असल्यामुळे काही समजले नाही. पण ऑगस्ट मध्ये नागपंचमी च्या दिवशी घरात जेवण बनवत असताना तीन छोटे – छोटे साप माझ्या जवळ आले तेव्हा मी घाबरले. परंतु छोटे – छोटे जीव पाहून मी त्यांना मारले नाही. त्यांची मुलासारखी देखभाल केली. आजही करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like