डिएसके यांचे पुत्र शिरीष कुलकर्णींचा अंतरिम जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला 

पुणे :पोलिसनामा ऑनलाईन

ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी डि.एस.कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याचा अंतरिम जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याची  माहिती समोर आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी डी एस कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी सध्या येरवडा येथील तुरुंगात आहेत यांच्यासह  एकूण सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबई डी. एस. कुलकर्णी यांचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांना अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जामिनासाठी केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील शिरीष यांचा अंतरिम जामीन  अर्ज फेटाळला आहे.

उच्च न्यायालयात जामीन बाबतीत निकाल देताना न्यायमूर्ती साधना जाधव म्हणाल्या होत्या. शिरीष कुलकर्णी हे स्वत:ला डीएसके या ब्रँडपासून वेगळे  ठरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद ऐकण्यास आम्हाला मुळीच रस नाही, असे म्हणत त्यांनी  अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्याऐवजी तुम्ही तो मागे घ्या असे स्पष्ट निर्देश दिले होते.आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे  डि.एस.कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी चांगलाच अडचणीत आला आहे.