मराठा आरक्षणाच्या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षणा संदर्भातील एक याचिका आज दि. २४ मे रोजी फेटाळली. यावर्षीपासून मेडिकल पीजी कोर्सला मराठा आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

या अध्यादेशाविरोधातीलही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयात यासाठी येण्याची गरज नव्हती, असंही कोर्टाने फटकारले असून कलम ३२ अन्वये उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या सर्व याचिकांना याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे, अशी माहिती राज्य सरकारचे वकील ऍड. निशांत कातनेश्वरकर यांनी दिली आहे.

राज्य सरकारने अध्यादेश काढून सुप्रीम कोर्ट आणि नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाला बगल देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आक्षेप घेणारी याचिका डॉ.समीर देशमुख व इतर विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.