स्टील ‘किंग’ लक्ष्मी मित्तलांचं स्वप्न पुर्ण होणार ! ‘एस्सार’ स्टील विकत घेण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने एस्सार स्टील संबंधी आपला निर्णय दिला आहे. न्यायालयाने NCLAT च्या निर्णयाचे खंडन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, CoC मध्ये सगळ्यांच्या हिताचा निर्णय करण्यात आलेला आहे. यामुळे आता लक्ष्मी मित्तल हे एस्सार स्टील विकत घेऊ शकतील. 2017 पासून मित्तल हे या कंपनीला विकत घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

सरकारी बँकांच्या शेअरने घेतली उसळी
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकारी बँकेच्या शेअर्स ने मोठी उसळी घेतल्याचे पहायला मिळाले. कॉर्पोरेशन बँकेचा शेअर 11 %, सेंट्रल बँकेचा शेअर 10 % , एसबीआयचा शेअर 5 % आणि पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स 3 % नी उसळी घेऊन तेजीत आल्याचे पहायला मिळाले.

पुढे काय होणार
यावर जाणकार सांगतात की, हा निर्णय बँकाच्या बाजूने लागलेला आहे या निर्णयानंतर एसबीआयला 10,239 रुपये मिळणार आहेत. आयडीबीआय बँकेला 4712 कोटी रुपये मिळणार आहेत. कॅनरा बँकेला 3639 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेला 2860 कोटी रुपये, आय सी आय सी आय बँकेला 2347 कोटी रुपये मिळू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाने बुडलेल्या कंपनीला 330 दिवसामध्ये निवाडा करण्याच्या निर्णयाला देखील स्थगिती देण्यास सांगितले आहे.

लॉ ट्रिब्यूनल (NCLT) या कंपनीला अहमदाबाद पीठाने कर्ज न फेडता आल्यामुळे दिवाळखोरीत आलेली एस्सार स्टील संबंधी मित्तल समूहाने दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्यास सांगितले आहे.

काय आहे नेमका प्रकार
दिवाळखोरी कोर्टाने आर्सेलर आणि त्याच्या भागीदार निप्पॉन स्टील कॉर्पोरेशनला कंपनीला 6 अब्ज डॉलर्स आणि आगामी देणेदारीसाठी 1.1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक देण्यास मान्यता दिली होती.

एस्सार स्टीलच्या विक्रीची निगराणी करणाऱ्या कंपन्यांना अधिक पेमेंटच्या मागणीवर विचार करण्यासाठी सांगितले आहे. स्टँडर्ड चार्टर्डने म्हटले होते की आर्सेलरने कर्जदारांना कर्ज परतफेड करण्याच्या योजनेनंतर त्याचे 3,500 कोटी रुपयांचे बहुतेक कर्ज थकबाकीदार राहील. यामुळे कर्ज देणाऱ्या बँकांचा पॅनल आपल्या मागील निर्णयावर अडून बसलेला होता आणि स्टेट बँकेने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयावर अपील केली होती.

Visit : Policenama.com