Supreme Court | पक्षचिन्ह आणि नाव याबाबत ठाकरे गटाची याचिका, सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला दिलासा नाही, सरन्यायाधीश म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना नाव (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला (Shinde Group) देण्याचा निर्णय घेऊन ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वकिलांनी कोर्टात केली. मात्र, सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाची ही मागणी फेटाळून लावत याचिकेवर ( Supreme Court) तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.

ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Advocate Abhishek Manu Singhvi) यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा उल्लेख केला. यावर सरन्यायाधीश म्हणाले, याचिकेला अर्जंट मेन्शन (Urgent Mention) करण्याची प्रक्रिया आहे. ज्याचे पालन केले पाहिजे. त्यसाठी तुम्ही उद्या या अशी सूचना दिली. ही याचिका मेन्शनिंग लिस्टमध्ये (Mentioning List) नव्हती. त्यासाठी कोर्टाने ( Supreme Court) ही याचिका उद्या घेण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेला निकाल पक्षपातीपणाचा आहे असा आरोप करत कोर्टाने निकालाल स्थगिती द्यावी अशी
मागणी ठाकरे गटाने याचिकेतून केली आहे.
सुप्रीम कोर्टात ही याचिका तातडीने सुनावणीसाठी यादीत आणण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा होता.
ठाकरे गटाची ही खेळी शिंदे गटाने आधीच ओळखली होती.
त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शिंदे गटाने लगेच सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले होते.

Web Title :- Supreme Court | uddhav thackeray faction of shivsena moves sc against losing symbol party name supreme court supreme court asks the lawyer to mention it tomorrow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ranbir Kapoor | रणबीर कपूरला पाहताच चाहतीने केले ‘हे’ कृत्य; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Politics | पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यावर विधीमंडळातील पक्ष कार्यालयही गेलं, शिंदे गटाने घेतला पक्ष कार्यालयाचा ताबा; ठाकरे गटाच्या आमदारांचे काय?