खा. सुप्रिया सुळेंना मुंबईत विचित्र अनुभव, पोलिसांकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे स्थानक किंवा बस स्थानका बाहेर रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा विचित्र अनभुव सगळ्यांनाच येतो. रिक्षा किंवा टॅक्सी नको असली तरी ते पाठिमागे लागतात. असाच अनुभव राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्थानकावर आला. सुप्रिया सुळे औरंगाबादहून देवगिरी एक्सप्रेसने प्रवास करून रात्री दादर स्थानकावर आल्या. त्यावेळी त्यांच्याकड दोन मोठ्या बॅग होत्या. हे सगळ सामना घेऊन खाली उतरत असताना एक व्यक्ती ट्रेनमध्ये शिरला. त्यावेळी त्यांनी त्याला
हटकले. तो ट्रेनमधून उतरला मात्र, त्याने त्यांच्याकडे टॅक्सी पाहिजे का ? असा तगादा लावला.

https://twitter.com/supriya_sule/status/1172008464110895104

सुप्रिया सुळे या रेल्वेमधून उतरून जात असताना देखील तो सारखा टॅक्सी पाहिजे का ? अशी विचारणा करत होता. सुळे यांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन बॅग हमालाकडे देऊन जात असताना देखील तो पुन्हा पुन्हा त्यांना टॅक्सी पाहिजे का ? अस विचारून भंडावून सोडत होता. अखेर त्यांनी या टॅक्सी चालकाकडून होत असलेली छळवणूक सर्वांसमोर आणण्यासाठी त्यांनी त्याचा फोटो काढला. नगरगट्ट टॅक्सी चालकाने त्यांना फोटोसाठी पोज देखील दिली. कुलजितसिंग मल्होत्रा असे त्या टॅक्सी चालकाचे नाव असून सुप्रिया
सुळे यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

या प्रकाराबाबत बोलाताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रेल्वे स्थानकावर एक टॅक्सीचालक आतमध्ये शिरून महिला प्रवाशांना भंडावून सोडतात. असे असले तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळेच मी ट्विटरच्या माध्यमातून हा प्रकार संगळ्यांच्या समोर आणला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत टॅक्सी चालक कुलजितसिंगचा शोध सुरु केला आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली असून अशा निगरगट्ट टॅक्सी चालकांविरोधात कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

You might also like