Supriya Sule | ‘पुण्याचे कारभारी बदलले आहेत, त्यामुळे…’, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंचे रणशिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule | पुण्याचे बरेच कारभारी बदलले आहेत. त्यामुळे मलाही पुण्यात थोडे काम करावे लागणार आहे. सर्वांप्रमाणे माझ्या आयुष्यातही संघर्ष आला आहे, असे म्हणत राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातील पक्षाच्या कामकाजात लक्ष घलण्याचे संकेत दिले आहे. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे (Navratri Festival) उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवारी गणेश क्रिडा रंगमंच येथे झाले. त्यावेळी त्या बोलत होते.

यावेळी प्रसिद्ध उद्योजक डॉ. संजय मालपाणी, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप, लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, छायाचित्रकार स्वागत थोरात, लावणी कलावंत रुपा आणि दीपा परभणीकर यांना लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने आणि शिरीष बोधनी यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार (Congress Leader Ulhas Pawar), मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi), रमेश बागवे (Ramesh Bagwe), काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महोत्सवाचे आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, पुण्यात नगरसेवक नसल्याने सगळ्याच कामांसाठी मला फोन येत आहेत. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने सर्व्हे बघणे बंद करुन निवडणुका वेळेत घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या महोत्सवाच्या पुढील म्हणजे तिसाव्या वर्षी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना नक्की बोलवाल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

महिला विधेयकात ‘जुमलेबाजी’

महिला आक्षणाच्या विधेयकाला कोणतेही राजकीय मतभेद मनात न ठेवता ‘इंडिया’ने पाठींबा दिला.
मात्र, त्यातही जुमलेबाजी झाली असून, त्यामध्ये तारखेचा कोणताही उल्लेख नसल्याचे लक्षात आले.
या विधेयकाची अंमलबजावणी 2029 पर्य़ंत होऊ शकत नाही. ‘इंडिया’चे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा
महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी नक्की करु, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांना ‘समाजवाद’ शब्द माहित आहे का?’

Rohit Pawar On Ink Splash On Chandrakant Patil | शाई फेक योग्य नाही – आमदार रोहित पवार

Amol Mitkari | भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर यांचे अजितदादांवर आरोप – अमोल मिटकरी

Pune Police MPDA Action | पुणे शहरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 49 वी स्थानबध्दतेची कारवाई