Supriya Sule On Mahayuti Govt Maharashtra | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर घणाघात, ”अब की बार गोळीबार सरकार” (Video)

पुणे : Supriya Sule On Mahayuti Govt Maharashtra | जर भर रस्त्यात गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपा आमदारांने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता (BJP MLA Firing Case). याचा अर्थ असा की ट्रीपल इंजिन सरकारकडून अशा गोळीबाराला कोणाचे तरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केला.

मुंबईत आज पहाटे बॉलिवुड अभिनेता सलमान खान (Firing Outside Of Salman Khan Home) याच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर सुप्रिया सुळे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त (Bhim Jayanti) सुप्रिया सुळे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्या बोलत होत्या. (Supriya Sule On Mahayuti Govt Maharashtra)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिले अशा
या महामानवाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण आमच्याकडून नेहमी केले जाणार आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकारचे धोरण बदलत चालले आहे का? भाजपचे खासदारच म्हणाले होते
की आम्हाला संविधान बदलायचे आहे. शेवटी पोटातील ओठांवर येतेच.
राज्यात काय परिस्थिती आहे ते सगळे बघतच आहेत. हे सगळे गृहमंत्र्यांचे अपयश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त