भिमा कोरेगाव प्रकरणी अटक केलेला सुरेंद्र गडलिंग उपचारासाठी ससूनमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

भीमा कोरेगाव दंगल घटना आणि माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींपैकी सुरेंद्र गडलिंगचा ब्लडप्रेशर वाढल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे यांना त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील घरातून पुणे पोलिसांकडून पहाटे अटक करण्यात आली. सुरेंद्र गडलिंग आणि महेश राऊत यांना नागपूरातून तर रोना विल्सन,शोमा सेन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. या सर्व अटक करण्यात आलेल्या आरोपीना न्यायालया समोर हजर केले असता. न्यायालयाने 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस कोठडी सुनावणी करून काही तास उलटले नाही , तोच यातील सुरेंद्र गडलिंगला आज रात्री अचानक ब्लडप्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान , आज (शुक्रवारी) भीमा कोरेगांव येथे विजय स्तभास मानवंदना देणे व शौर्य दिवसा साजरा करण्याच्या कार्यक्रमा दरम्यान उफाळलेल्या दंग्यामध्ये राहुल बाबाजी फटांगडे (30, रा. साईनाथनगर, डोंगरवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर) याचा खून करणार्‍यांचा व्हिडीओ आणि फोटो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) मिळाले असून आरेापींबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी सीआयडीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.