Surendra Kumar Agarwal | सुरेंद्र अग्रवालची गुन्हेगारी कुंडली, भावाला अडकवण्यासाठी भावाच्याच सुनेचा वापर, नगरसेवकाच्या हत्येची सुपारी… आता नातवासाठी घरच्या ड्रायव्हरला डांबले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Surendra Kumar Agarwal | पुणे पोर्शे कार अपघातात अभियंता तरूण-तरूणीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण देशात गाजत आहे. यातील अल्पवयीन आरोपी हा प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालचा (Vishal Agarwal Builder) मुलगा आहे (Porsche Car Accident Pune). तर विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार यांना देखील या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण अग्रवाल कुटुंब हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे आता समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची तर अख्खी गुन्हेगारी कुंडली नातवाच्या या प्रकरणामुळे समोर आली आहे. (Kalyani Nagar Accident)

पुणे पोर्शे कार अपघातात सध्या अग्रवाल कुटुंबातील नातू, वडील आणि आजोबा अशा तीन पिढ्यांचे प्रतिनिधी गजाआड आहेत. अल्पवयीन आरोपीने आलिशान पोर्शे कारखाली दारूच्या नशेत तरूण-तरूणीला चिरडल्यानंतर आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालने गुन्ह्यातील पुराव्याशी छेडछाड केल्याच्या आरोप ठेवत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) त्याला अटक केली आहे.(Surendra Kumar Agarwal)

अपघातनंतर पळून आलेला घरचा ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला सुरेंद्र कुमार अग्रवालने दोन दिवस डांबून ठेवले होते. तसेच बिल्डर मुलगा विशाल अग्रवालला पळून जाण्यास मदत केल्याचा आणि नातवाने केलेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी चालकावर दबाव आणल्याचा आरोप सुरेंद्र अग्रवालवर आहे. (Pune Police)

पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी माहिती देताना सांगितले होते की, दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर लगेचच, चालक बदलण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून नातू अडचणीत येऊ नये. हे खरं आहे की सुरुवातीला ड्रायव्हरने सांगितले होते की तो कार चालवत होता. ड्रायव्हरने कोणाच्या दबावाखाली हे वक्तव्य केले याचाही आम्ही तपास करत आहोत.

त्या काळात चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही याचीही चौकशी करत आहोत, अशी माहिती आयुक्तांनी दिली होती. अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने लक्झरी कार चालवल्याचे दाखवणारे व्हिडिओ पुरावे असल्याचेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.

सुरेंद्र अग्रवालवर सीबीआयने (CBI) आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात दावा केला आहे की त्यांनी २००९ मध्ये शिवसेना नगरसेवक अजय भोसले (Shivsena Leader Ajay Bhosale) यांची हत्या करण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला (Chhota Rajan) सुपारी दिली होती. त्यामुळे छोटा राजनसोबतचे त्याचे संबंधही उघड झाले आहेत.

तसेच, पुण्यातील माजी नगरसेवक अजय भोसले यांचे सुरेंद्र अग्रवाल याचा भाऊ राम अग्रवाल (Ram Agarwal) यांच्याशी संबंध होते. राम आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यामध्ये पैशावरून वाद सुरु होता. काही हजार कोटींमध्ये हा वाद होता. याच वादात राम कुमार अग्रवालने स्वत:च्या सुनेला हात घातल्याची तक्रार सुरेंद्र कुमार अग्रवालने पुण्यातील पोलिस ठाण्यामध्ये दिली होती.

सुनेच्या मदतीनेच सुरेंद्र कुमारने राम अग्रवालविरोधात केस केली होती.
त्यामुळे या प्रकरणात राम कुमार कुटुंबासह १५ ते २० दिवस फरार झाला होता.
अटकपूर्व जामीन घेतल्यानंतर राम कुमार पुण्यात परतला होता,
असे अजय भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते.

अनिल भोसले यांनी सांगितले की, या प्रकरणानंतर दोघा भावांमधील शत्रुत्व आणखी वाढले.
पैसा असल्याने सगळे विकत घेऊ शकतो, असे त्यांना वाटते. कायदा आणि सुव्यवस्थेची त्यांना अजिबात भीती नाही.
ते कोणत्याही खात्यात गेल्यास त्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली

Surendra Kumar Agarwal Arrest | पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई !
अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबून ठेवले, धमकी दिली

Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर;
मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड

Dombivli MIDC Blast | डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या वाढली, अजूनही सापडत आहेत मानवी अवशेष, आकडा आणखी वाढण्याची शक्यता

Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे,
पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…