माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती ‘चिंताजनक’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव घरकुल घोटाळ्यातले आरोपी असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. जैन यांची हार्ट सर्जरी झाली होती. तसेच त्यांना अनेक आजारही आहेत. आज त्यांना कारागृहात अस्वस्थ वाटू लागल्याने नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच गरज पडल्यास त्यांना मुंबईला हलवण्यात येईल असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

सुरेश जैन यांना परवानगी मिळाल्यानंतर मुंबईत जेजे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येईल अशी महिती देण्यात आली आहे. जैन हे जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात कारगृहात असल्याने त्यांना परवानगीनंतरच हलविण्यात येऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. सप्टेंबर महिन्यात सुरेश जैन आणि इतर आरोपींना घरकुल घोटाळा प्रकरणात न्यायालायाने दोषी ठरवलं. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यासह 38 आरोपींची रवानगी नाशिकच्या कारागृहात करण्यात आली.

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, चोपड्याचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सर्व 48 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते. नंतर विशेष जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी सुरेश जैन यांना 7 वर्षांचा कारावास आणि 100 कोटींचा दंड ठोठावला. गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला. तर माफीच्या साक्षीदार सिंधू विजय कोल्हे यांची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com