घरकुल घोटाळा : माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 तर गुलाबराव देवकर यांना 5 वर्षाची शिक्षा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मंत्री सुरेश जैन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. घरकुल घोटाळा प्रकरणात धुळे जिल्हा न्यालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निकालात सुरेश जैन यांना ७ वर्षाची सुनावण्यात आली आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांना ५ वर्षाची सजा सुनावली आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात माफीचा साक्षीदार म्हणून भूमिका वठवलेल्या सिंधू विजय कोल्हे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांना ७ वर्षाची सजा सुनावली आहे. सोबतच १०० कोटींचा दंडही ठोठावला आहे. सोबतच गुलाबराव देवकर यांना ५ वर्षाची सजा आणि ५ लाखाचा दंड ठोठावला आहे. या घोटाळा प्रकरणात इतरही ४८ आरोपींना न्यायाधीशांनी दोषी ठरवले आहे.

काय होता घरकुल घोटाळा , जाणून घ्या
सुरेश जैन मंत्री असताना जळगाव नगरपालिकेने हि महत्वकांक्षी योजना राबवली होती. ही योजना राबवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना स्वस्त किमतीत चांगली घरे बांधून देणे आणि झोपडपट्टीचे पूर्णपणे निर्मूलन करणे हे होते. हि योजना १९९९ मध्ये खंडेरावनगर, तांबापुरा आणि विठ्ठलनगर या ठिकाणी राबवण्यात आली होती. त्यासाठी तब्बल ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुल बांधली गेली. परंतु काही वर्षानंतर म्हणजेच २००१ मध्ये या योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले.

ज्या ठिकाणी हि घरं बांधण्यात आली होती ती जागाच मुळात नगरपालिकेच्या मालकीची नव्हती. सोबतच अनेक कायद्यांचे उल्लंघन, गैरव्यवहार, अनियमितता, मनमानी पद्धतीने निर्णय घेण्यात आल्याचे दिसून आले होते. त्या वेळेस सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील बांधकाम धारकाला हे काम मिळवून दिले होते. अनेक नियमांना मूठमाती देत त्याला २९ कोटी बिनव्याजाचे तसेच आगाऊ दिले होते. जो ठेकेदार होता त्याने विहित मुदतीत घरे बांधून दिली नाहीत तरीही त्याच्यावर कसलीच कारवाई केली गेली नव्हती.

जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (IAS ) यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी अखेर ३ फेब्रुवारी २००६ रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत २९ कोटी ५९ ला लाख ९ हजार रुपयांचा गैरप्रकार झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून या घोटाळ्यातील आरोपींवर धुळे जिल्हा न्यालयात सुनावणी सुरु होती. घरकुल घोटाळा प्रकरणात दिलेला हा निकाल यायला खूप उशीर लागला आहे. परंतु दोषींना मोठी शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like