कौतुकास्पद ! कॅन्सर पिडीतेकडून 30000 पेक्षा जास्त झाडांची ‘लागवड’, मृत्यूशी झगडणारी ही मुलगी दुसर्‍यांना देतेय ‘जीवन’

सुरत : वृत्तसंस्था – गुजरातमधील सुरतमध्ये राहणाऱ्या एका 27 वर्षीय कॅन्सर पीडित महिलेने 30 हजारांपेक्षा जास्त झाडे लावली आहेत. श्रुचि वडालियाला काही महिन्यांपूर्वी लक्षात आले की ती ब्रेन ट्यूमरची शिकार झाली आहे. डॉक्टरांनी तपासानंतर तिला सांगितले की ती ब्रेन ट्यूमरच्या अंतिम स्टेजमध्ये आहे. म्हणजेच अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. परंतु हे माहित झाल्यानंतर श्रुचि वडालियाने अनेक ठिकाणी झाडे लावली.

2 वर्षात लावली 30 हजार झाडे, काही महिन्यांपूर्वी कळाले की कॅन्सर झाला –
श्रुचि वडालिया हिच्या मते ती 2 वर्षांची असल्यापासून झाडं लावत आहे. पर्यावरण वाचण्यासाठी तिने एक मोहिम देखील सुरु केली होती. स्वत: मृत्यूशी झुंज देत असताना ती इतरांना शुद्ध वातावरण देऊ इच्छित आहे. श्रुचि म्हणाली की वायु प्रदुषणामुळे लोक गंभीर आजारांची शिकार होत आहेत. त्यामुळे आवश्यकता आहे की पर्यावरणासाठी काहीतरी केले पाहिजे. झाडं लावली पाहिजेत आणि जनजागृती केली पाहिजे.

स्वच्छ वातावरणाने दुसऱ्यांची जीवन वाचवले जाऊ शकते –
श्रुचि म्हणाली की, आता माझी जी परिस्थिती आहे ते बघता मी लवकरच जीवन सोडू शकते. परंतु मी जास्तीत जास्त झाडे लावून लोकांच्या श्वासात जिवंत राहू इच्छित आहे. माझ्या आजारात देखील मोठे कारण आहे वायु प्रदुषण. ज्यामुळे कॅन्सर सारखे आजार होतात. जास्तीत जास्त झाडं लावल्याने या गंभीर आजारापासून दुसऱ्यांचे जीवन सावरता येईल.

माझ्यासारखी वेळ कोणावर येऊ नये –
श्रुचि जवळच्या गावात शाळेत देखील जाते. तेथे ती विद्यार्थ्यांना झाडं लावण्यासाठी प्रेरित करते. तसेच यामुळे होणारे फायदे सांगते. ती म्हणते की माझ्यासारखी वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/