Suryakumar Yadav | सूर्यकुमारने रचला इतिहास ! पाकिस्तानच्या रिझवानला मागे टाकत मिळवले अग्रस्थान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या खेळीमुळे भारताने अनेक सामने जिंकले आहेत. बुधवारी आयसीसीने (ICC) या आठवड्याची ताजी टी20 रँकिंग (T-20 Ranking) जाहीर केली. या रँकिंगनुसार सूर्याने मोठी झेप घेत अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) पाकिस्तानचा (Pakistan) सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) मागे टाकले आहे.

सूर्यकुमार यादवने रचला इतिहास
गेल्या वर्षी मार्चमध्ये टी20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या खेळीच्या जोरावर संघात आपले स्थान पक्के केले आहे. त्याने आपल्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. क्रिकेटच्या सर्व छोट्या फॉरमॅटमध्ये एक सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून समोर आला आहे.

टी 20 रँकिंगमध्ये बनला जगातील नंबर 1 फलंदाज
सूर्यकुमारने भारताकडून 37 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये एक शतक आणि 11 अर्धशतके यांचा समावेश
आहे. त्याने 13 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार सूर्यकुमार 863 पॉईंटसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
या यादीत पाकिस्तानचा रिझवान 842 पॉईंटसह दुसऱ्या स्थानी आहे तर न्यूझीलंचा कॉनवे 792 अंकांसह
तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.

Web Title :- Suryakumar Yadav | suryakumar yadav top 1 in icc t20 ranking

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर

Maharashtra ACP / DySP To DCP/Addl SP | राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना उपायुक्त / अप्पर पोलीस अधीक्षक पदी बढती ! समीर शेख, सागर कवडे, प्रिती टिपरे यांचा समावेश