Sushama Andhare | संजय शिरसाटांना ‘ते’ विधान भोवणार?, सुषमा अंधारेंकडून महिला आयोगाकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणारे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde Group MLA Sanjay Shirsat) अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे (State Commission for Women) तक्रार दाखल केली आहे. 26 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित बैठकीत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे विधान केले होते.
संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी महिला आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. महिला आयोगाने तातडीन यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशाराही अंधारे यांनी दिला आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि भाजपची (BJP) कोंडी होण्याची शक्यता आहे. आता यावर संजय शिरसाट कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.
काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय शिरसाट यांनी शिवसेना मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मात्र, यावेळी शिरसाट यांचा तोल गेला आणि त्यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले होते की, ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत.., असं वक्तव्य शिरसाट यांनी केले होते.
सुषमा अंधारेंचा शिरसाटांवर पलटवार
संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
संजय शिरसाटांनी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले.
इतरांच्या लेकीबाळीकडे, आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील पारमिता असावी लागते.
सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट सारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. अन् ज्याच्या ठायी शील पारमिता नाही ती व्यक्ती बाबासाहेबांचा अनुयायी तरी असु शकते का असा प्रश्न उरतोच. उलटपक्षी शिरसाट यांच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकिबाळीकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिला. म्हणुनच मला शिरसाट यांच्या बोलण्याचा राग आला नाही. उलट स्वतः ची वैचारिक लायकी दाखवून दिल्या बद्दल त्यांचें अभिनंदन, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून..
सुषमा अंधारे यांनी मंगळवारी (दि.28) ट्विट करुन म्हटले, संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा
ही व्यक्तीशः मलाच नाही, तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आहे.
बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी भाषा आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, असं त्यांनी सांगितलं.
संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी & बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी भाषा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
@ShivsenaUBTComm @AUThackeray— SushmaTai Andhare (@andharesushama) March 28, 2023
Web Title :- Sushama Andhare | sushma andhare file complaint against sanjay shirsat after controvercial statement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update