SSR मृत्यू प्रकरण : चौकशीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली सीबीआय, लवकरच करणार खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला कित्येक महिने लोटले आहेत आणि आजही त्याचे चाहते त्याला न्याय मिळण्याची वाट पाहत आहेत. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) कित्येक महिन्यांपासून सुशांतच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीत गुंतली आहे. अशा परिस्थितीत आता सूत्रांनी खुलासा केला आहे की सीबीआय आपल्या तपासाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे आणि लवकरच सुशांतच्या मृत्यूचे खरे कारण समोर आणू शकतील. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा खटला सीबीआयने हातात घेतल्यानंतर त्यांनी अनेक बाबींचा खोलवर तपास केला आहे. .

अभिनेता सुशांतसिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील त्याच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणात सीबीआयने सुशांतच्या घरात काम करणाऱ्या लोकांची, त्याच्या कुटुंबाची, प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि ड्रायव्हर्सची चौकशी केली. याशिवाय सर्वांचे निवेदनेही नोंदविण्यात आली. तसेच सुशांत उपचार करणारे डॉक्टर आणि त्याच्या मानसोपचारतज्ज्ञांचीही चौकशी केली गेली.

अलीकडेच एजन्सीकडून सांगितले गेले की, “सीबीआय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय खोलवर व व्यावसायिकपणे चौकशी करीत आहे. या तपासणी दरम्यान मोबाइल फॉरेन्सिक उपकरणांच्या मदतीने डिजिटल उपकरणांकडून डेटा काढला गेला आहे. “या व्यतिरिक्त असेही सांगण्यात आले की, तपास पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण समजून घेण्यासाठी अनेक वेळा घटनेच्या ठिकाणी तपास केला आहे. आपल्या कामातील तज्ज्ञ समजल्या जाणार्‍या सीएफएसएलने सुशांतच्या मृत्यूच्या जागेची चौकशी करण्यातही मदत केली आहे. ”

काय असेल सीबीआयचा निर्णय ?
सीबीआयने अलिगड, फरीदाबाद, हैदराबाद, मुंबई, मानेसर आणि पाटणा येथे जाऊन आपल्या तपासासाठी पुरावे गोळा केले आहेत आणि लोकांचे निवेदनही नोंदवले आहे. एम्सच्या अहवालाबद्दल बोलायचे झाल्यास, सुशांतसिंह राजपूतच्या व्हिसेराच्या तपासणीसाठी एम्समध्ये डॉक्टरांची एक टीम तयार केली गेली. काही काळापूर्वी सीबीआयला दिलेल्या अहवालात डॉक्टरांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले होते आणि त्यात खुनासारखे काहीही आढळले नाही. दरम्यान, सीबीआय आता कोणता निर्णय देईल, हे जाणून घेण्याची लोक वाट पाहत आहेत.