चाहते, कुटुंबीयांकडून सुशांतच्या आठवणींना उजाळा, जन्मदिनी प्रेम वाटून साजरा करण्याचं बहिणीचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईतील वांद्र्यामधील राहत्या घरी १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृतावस्थेत सापडला होता. सुशांतसारख्या उत्तम अभिनेत्याच्या मृत्यूने संपूर्ण देशभर स्तब्ध झाला होता, विशेषत: त्याचे चाहते अतिशय निराश झाले होते. सुशांतची आज जयंती या निमित्ताने चाहते त्याचं स्मरण करत आहे. सोशल मीडियावर चाहते त्याच्याबाबतच्या आपल्या आठवणी शेअर करत आहे. दुसरीकडे सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने आपल्या भावाच्या चाहत्यांना विशेष आवाहन केलं आहे. सुशांत जगलेल्या आयुष्याचा सोहळा करण्याचे आणि २१ जानेवारी या त्याच्या जन्मदिनी प्रेम वाटून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

सुशांतच्या जन्मदिनी बहिण श्वेता सिंह किर्तीने आपल्या भावाच्या चाहत्यांना विशेष आवाहन केलं आहे. त्याच्या जन्मदिनी प्रेम वाटून साजरा करण्याचं आवाहन तीन केलं असून तिने लिहिलं आहे की, “आपल्याला २१ जानेवारीला सुशांतचा जन्मदिवस कसा साजरा करायला हवा….कोणता सल्ला?
तिने पुढे लिहिलं आहे की, त्याच्या गाण्यांवर डान्स करुन चाहत्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलेले मला आवडेल. त्याच्या आयुष्याचा जल्लोष साजरा करुया आणि प्रेम तसंच आनंद परवण्यात मदत करा.

सीबीआय अद्यापही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही

सुशांतचे कुटुंबीय आणि चाहत्यांनी सुशांतने आत्महत्या केली नसून ही हत्या असल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. दरम्यानच्या काळात त्याच्या मृत्यूच्या तपासाची लागली. तसेच हा तापास सीबीआयकडे देण्याची मागणीही जोर धरू लागली. यानंतर देशभरातून आवाज उठला गेला. कालांतराने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. परंतु अनेक महिन्यानंतरही सीबीआय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सीबीआयने म्हटलं आहे की सुशांत सिंह प्रकरणात सर्व पैलू विचारात घेतले जात आहे. सध्या कोणत्याही शक्यतेचा इन्कार केला जाऊ शकत नाही.

सुशांतच्या मृत्यूनंतर कोणकोणते मुद्दे चर्तेत?

सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक नवनवीन गोष्टी समोर आल्या. रिया चक्रवर्तीसोबतचे प्रेमसंबंधही फार चर्चेत होते. लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या सुशांत आणि रियाशी संबंधित प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनली होती. त्याच्या मृत्यूनंतर ‘नेपोटिझम’चा मुद्दाही समोर आला होता. गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीच्या मते, सुशांत डिप्रेशनमध्ये होता. यानंतर या प्रकरण ड्रग अँगलही समोर आला. दरम्यान या प्रकरणी रियाला एक महिना तुरुंगात राहावं लागलं होतं.