SSR Case : परदेशातील रस्त्यावर देखील होतेय सुशांतला न्याय देण्याची मागणी, बहिणीनं शेअर केला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूतच्या न्यायासाठी संपूर्ण देश एकत्र उभा आहे. सुशांतला केवळ देशातच नव्हे तर परदेशातही न्याय मिळवून देण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. सुशांतची बहीण सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर सुशांतच्या कुटुंबियांना आणि त्याच्या चाहत्यांना न्याय मिळेल याची खात्री आहे. श्वेता सिंह कीर्तीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की लोक सुशांतला परदेशातही न्याय मिळवून देण्यासाठी कसा प्रयत्न करत आहेत.

कॅलिफोर्नियामध्ये सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने अमेरिकेतील बिलबोर्डचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले- ‘कॅलिफोर्नियामधील भावाचे बिलबोर्ड. हे ग्रेड मॉल पार्कवेच्या बाहेर पडल्यावर अगदी ८८० उत्तरेच्या बाजूला आहे. ही जागतिक स्तरावरील चळवळ आहे.

सोशल मीडियावर सुशांतचे चाहते #JusticeforSushantSinghRajput च्या माध्यमातून न्यायाची मागणी करत आहेत. वास्तविक सुशांतच्या चाहत्यांनी न्यायासाठी #Warriors4SSR अभियान सुरू केले आहे, ज्यात सुशांतच्या कुटूंबानेही भाग घेतला.

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही या डिजिटल मोहिमेत सहभागी झाली. ती सुशांतच्या आईच्या फोटोसह दिसली, पोस्ट शेअर करत तिने लिहिले – ‘आम्हाला खात्री आहे की तुम्ही दोघेही एकत्र असाल.’

सुशांत सिंह राजपूतचे १४ जून २०२० रोजी निधन झाले होते. त्याचा मृतदेह त्याच्या वांद्रा येथे असलेल्या घरी सापडला होता. मुंबई पोलिसांनी सुरुवातीच्या तपासणीनंतर या प्रकरणाला आत्महत्या असल्याचे म्हटले होते. मात्र कुटूंबाने पाटणामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणात नवीन वळण आले. सुशांतचे वडील केके सिंह यांनी २५ जुलै रोजी पाटण्यात रिया चक्रवर्तीसह ६ आरोपींविरूद्ध आपल्या मुलाची फसवणूक केल्याची आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

त्याचबरोबर मुंबई आणि बिहार पोलिसांच्या वाढत्या वादात सुशांतचे मृत्यू प्रकरण सीबीआयने आपल्या हाती घेतले आहे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी नवी दिल्लीतील अँटी करप्शन युनिट ६ मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संचालक आर.के. शुक्ला यांच्यासह सीबीआयच्या इतर अधिकाऱ्यांनी घेतला आहे.