सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांचा मुंबईत पोलिसांबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी मंगळवारी पटणा येथील पोलीस ठाण्यात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतच्या वकिलांनी एफआयआर दाखल करण्यात एवढा उशीर का झाला याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबई पोलीस एफआयआर दाखल करून घेत नव्हती. त्याशिवाय सुशांतच्या घरच्यांवर प्रॉडक्शन हाऊसची नावं देण्यासाठी दबाव टाकत होती.

सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी यावेळी अनेक धक्कादायक खुलासे केले. केस दाखल करण्यास 44 दिवसांचा कालावधी फक्त याचसाठी लागला की, मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेत नव्हती. तसेच पटणा पोलीस देखील लगेच तयार झाले नाही. मात्र, मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि मंत्री संजय झा यांनी मध्यस्ती केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आली. त्यासोबतच या घटनेची पुढील चौकशी पटणा पोलिसांनी करावी अशीही सुशांतच्या वडिलांची इच्छा आहे. मात्र कुटुंबाने अद्याप सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली नाही.

काय म्हणाले पटणा पोलीस
सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच पटणाचे सिटी पोलीस अधीक्षक विनय तिवारी म्हणाले, की आता एफआयआर दाखल झाली आहे. प्राथमिक चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोणावर प्रश्न उपस्थित करायचे यावर बोलणे योग्य राहणार नाही. सुशांतच्या वडिलांनी ज्या ज्या नावांचा उल्लेख केला त्या सर्वांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.