सुशांतची हत्या की आत्महत्या हे गूढ उलगडणार ? एम्सनं CBI कडे सोपवला अहवाल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयानं सीबीआयला अहवाल सोपवला आहे. या अहवालाच्या आधारेच आता सीबीआय पुढील तपास करणार आहे. सुशांताची हत्या झाली की त्यानं आत्महत्या केली याबाबत सीबीआय यावरूनच आत निष्कर्ष काढणार आहे.

एम्सच्या अहवालानंतर या प्रकरणी सीबीआय अंतिम निर्णय घेण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. एम्सनं सुशांतचा ऑटोप्सी व व्हिसेरा तपास अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. त्यामुळं सीबीआय या अहवालाची इतर पुराव्यांसोबत तुलना करेल. या अहवालाच्या आधारे सीबीआय पुढील तपास करणार आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचं राहिलेलं नाही असा आरोप सुशांतच्या कुटुंबियांचे वकिल विकास सिंह यांनी केला आहे. परंतु आता एम्सनं अहवाल सादर केल्यानंतर आता सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरू होईल आणि अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्यं उघडकीस येतील.

सर्वच अँगलनं या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. सुशांतच्या मृत्यूची व्यावसायिक पद्धतीनं चौकशी केली जात आहे. सर्वच बाबींचा बारकाईनं तपास केला जात आहे असं सीबीआयनं म्हटलं आहे. याशिवाय या प्रकरणी सुशांतचे कुटुंबीय आणि त्याच्या बहिणींची सीबीआयकडून चौकशी केली जाऊ शकते.