Sushma Andhare On Devendra Fadnavis | फडणवीसांचे पक्षातील वजन कमी झालंय का? अंधारेंच्या पोस्टनंतर चर्चेला उधाण, ”त्यांना विनोद तावडेंनी चितपट केलंय”

मुंबई : अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून भेटीसाठी लवकर वेळ न मिळणे, राष्ट्रीय स्तरावर विनोद तावडे (Vinod Tawde) यांना मिळालेली मोठी संधी, पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना मिळालेली लोकसभेची उमेदवारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे (NCP Eknath Khadse) यांचे पुन्हा स्वगृही परतणे, यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस (Sushma Andhare On Devendra Fadnavis) यांच्याबाबत ‘एक्स’वर केलेली सूचक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये विनोद तावडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चितपट केल्याचे म्हटले आहे. तसेच मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, या फडणवीस यांच्या प्रसिद्ध डायलॉगची खिल्ली उडवली आहे.

सुषमा अंधारे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंकजा मुंडे-महादेव जानकर यांना उमेदवारी, जळगावचा जाहीर उमेदवार बदलण्याची तयारी, एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शाह यांच्याशी भेट, देवेंद्र फडणवीसांना भेटीसाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागणं, पण त्याचवेळी नवनीत राणा यांना मात्र तासाभरात भेट… या सगळ्याचा अर्थ फडणवीसांना विनोत तावडेंनी चितपट केलं आहे. या मजकुराच्या खाली अंधारे यांनी आताकधीचयेणारनाही असा हॅशटॅग देत फडणवीसांना टोला लगावला आहे.

दरम्यान, २०१९च्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांवेळी विनोद तावडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याच्या चर्चा होती. तसेच पंकजा मुंडे, एकनाथ खडसे देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत होते. यानंतर खडसे राष्ट्रवादी गेले. काही काळानंतर आता विनोद तावडेंना राष्ट्रीय राजकारणात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. सध्या ते राष्ट्रीय सरचिटणीस आहे.

तर दुसरीकडे, २०२० साली देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात आले आहेत. त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. दरम्यान, नाराज पंकजा मुंडें, तसेच रक्षा खडसे, महादेव जानकर, यांना पक्षाने उमेदवारी दिली. तर फडणवीसांना दिल्लीश्वरांच्या भेटीसाठी ताटकळत बसावे लागत आहे, या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी ही सूचक पोस्ट केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोठी बातमी! स्वगृही परतण्याच्या वृत्ताला एकनाथ खडसेंचा दुजारा, म्हणाले ”मी दिल्लीत जाऊन…”