Sushma Andhare | सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप, म्हणाल्या – ललित पाटीलचा ‘एन्काऊंटर’ होऊ शकतो किंवा…

पुणे : Sushma Andhare | ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital Draugs Case) पलायन केलेला नाशिकचा ड्रग्ज माफिया सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ड्रग्ज प्रकरणात सध्या रोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता याप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. अंधारे यांनी म्हटले आहे की, ड्रग्ज तस्करीतील आरोपी ललित पाटीलचा (Draug Mafia Lalit Patil) एन्काऊंटर (Encounter) होऊ शकतो. सध्या कशावरच विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.

एन्काऊंटर किंवा संशयास्पद मृत्यू
ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक आरोप करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो किंवा संशयास्पद मृत्यू होऊन हा तपास थांबवला जाईल. सध्या कशावरच विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे या प्रकरणात ललित पाटीलच्या जीवाचे रक्षण हेही एक मोठे आव्हान असेल. (Sushma Andhare)

ससूनमध्ये ड्रग्ज सापडणे हे चिंताजनक
सुषमा अंधारे म्हणाल्या, दीड महिन्यापासून आम्ही ललित पाटील प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. यात राज्यातील तरुणांचे भविष्य वाचवणे हा हेतू आहे. ससूनसारख्या ठिकाणी २ कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडणे ही अत्यंत चिंताजनक, धक्कादायक आणि गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे ससूनमधील काही लोकांची चौकशी होणे गरजेचे आहे.

सगळ्या लोकांची चौकशी करा
सुषमा अंधारे म्हणाल्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना काय घडले होते हे विचारले पाहिजे.
एखादा कैदी रुग्ण रुग्णालयात येत असेल, तर कारागृह अधीक्षक आणि त्यांच्या अखत्यारीतील अधिकाऱ्यांकडून
आधीच माहिती येत असेल. ती माहिती डीनकडे आणि तेथून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जात असेल.
त्यामुळे या सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे.

ससूनच्या डीनची चौकशी व्हावी
सुषमा अंधारे म्हणाल्या, ससूनच्या डीनची चौकशी व्हावी असे आम्ही खूप आधीपासून सांगत आहोत.
आता तर त्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वार्ड क्रमांक १६ मध्ये ललित पाटीलवर उपचार करणारे डॉक्टर संजीव ठाकूर आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मेट्रो कामगारांचे अपहरण करुन रोकड लुटली, पुण्यातील घटना

Lalit Patil Drug Case | तातडीची शस्त्रक्रिया सांगितली असताना ललित पाटील 10 दिवस वेगवेगळ्या शहरात कसा फिरत होता?, रविंद्र धंगेकरांचा सवाल