सुषमा स्वराज यांच्या अभिनंदनाचे ट्विट डिलिट करण्याची नामुष्की ‘या’ दिग्गज नेत्यावर ओढवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्यावर वेगळीच नामुष्की आज ओढवली. त्यांनी ट्विटरवरून माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल अभिनंदन करणारे ट्विट केले त्यामुळे तशा बातम्यांदेखील प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्या. परंतु काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केल्यामुळे मात्र मोठा संभ्रम सर्वत्र पसरला आहे. राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चांना उधाण आलं.

काय म्हणाले होते हर्षवर्धन ट्विट मध्ये

“भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेश च्या राज्यपालपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वच क्षेत्रांमधील त्यांचा दांडगा अनुभव असल्याने त्याचा फायदा आंध्रप्रदेशच्या जनतेला नक्कीच होईल.”

त्यांनी हे ट्विट डिलिट केल्याने सर्वत्र संभ्रम पसरला आहे कारण यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा आत्तापर्यंत झालेली नाही.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुषमा स्वराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नव्हत्या आणि त्या नुकत्याच स्थापन झालेल्या मोदी सरकार २.० मध्येही सामील नाहीत. काहींच्या मते याचे कारण सुषमांचे प्रकृती अस्वास्थ्य हे आहे तर काही जाणकारांनी मोदी सरकारच्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न देण्याच्या अलिखित नियमामुळे त्यांना डावलले गेल्याचे म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर