सुशांतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’चा ट्रेलर पाहून खूपच ‘भावूक’ झाली सुष्मिता सेन ! व्यक्त केली ‘ही’ खंत (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा दिल बेचारा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रत्येकजण ट्रेलर पाहिल्यानंतर भावूक होताना दिसत आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन हीदेखील ट्रेलर पाहून इमोशनल झाली आहे. तिनं एक पोस्टही शेअर केली आहे.

‘पर्सनली सुशांतला ओळखत नव्हते’

सुष्मितानं तिच्या इंस्टावरून एक इमोशनल नोट शेअर केली आहे. यात सुशांताच्या दिल बेचारा सिनेमाचं पोस्टर आहे. यात तिनं लिहिलं की, “मी सुशांतला वैयक्तिरित्या ओळखत नव्हते. मी त्याचे काही सिनेमे आणि काही मुलाखती पाहिल्या होत्या. त्याच्याकडे ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन कमालीचा इमोशनल इंटेलिजेन्स होता. मला वाटतं की, मी आता त्याला चांगलं ओळखते. तो खूप साधा सरळ, प्रेमळ, दयाळू होता. त्याच्या चेहऱ्यावरील स्माईलनंही याची खात्री पटते. तो एक टॅलेंटेड अॅक्टर आणि चांगला माणूस होता.”

‘काश… तुझ्यासोबत सिनेमात काम करू शकले असते’

सुष्मिता पुढे म्हणाली, “काश, मला त्याला ओळखायला संधी मिळाली असती. मी त्याच्यासोबत काम करू शकले असते. एका ब्रह्मांडामधून दुसऱ्या ब्रह्मांडाची रहस्ये जाणून घेण्यासाठी वेळ असायला हवा होता. हेही माहित पडलं असतं की, आम्हाला 47 नंबरबद्दल आकर्षण का आहे.” सुष्मितांन दिल बेचाराच्या टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुकेश छाबडा डायरेक्टेड दिल बेचारा हा सिनेमा 24 जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. खास बात अशी की, प्लॅटफॉर्मचे सब्सक्रायबर्स आणि नॉन सब्सक्रायबर्स असे सारेच हा सिनेमा पाहू शकणार आहेत.