सुष्मिताने बिकिनी घालून फडकवली ओढणी, बोल्ड फोटोवरील चाहत्यांच्या कमेंट्स व्हायरल

दिल्ली : वृत्तसंस्था – बाॅलीवूड ऍक्टरेस आणि 1994 सालची मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनची जादू कधीच फिकी पडतानाच दिसत नाही. तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे ती अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ती आजही इतकी फिट दिसते की तिच्या वयाच्या इतर महिलांना ती सहज लाजवेल.

ती नेहमीच आपल्या फोटोेंमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. काही दिवसांपासून ती आपल्यापेक्षा वयाने 15 वर्षाने लहान असणाऱ्या बाॅयफ्रेंडला डेट करत आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर असा फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर चांगलाच गाजताना दिसत आहे. याच फोटोवर अनेकांनी अनेक वेगवेगळ्या कमेंट केल्या. काहींनी तर तिलो डेट करण्याचीही आपली इच्छा बोलून दाखवली.

बिकिनी घालून फडकवली ओढणी
सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असा फोटो शेअर केला आहे ज्यात ती स्विमींग पूलाजवळ उभी राहिली आहे आणि हातातील लेवेंडर कलरची ओढणीहवेत फडकवत आहे. इतकेच नाही तर याच रंगाची बिकिनीही तिने घातलेली या फोटोत दिसत आहे. या लुकमध्ये ती चांगलीच आकर्षक दिसत आहे. बॅकग्राऊंडला निळे आकाश दिसत आहे तर समोर स्विमींग पूल आहे ज्यात आकाशाचे प्रतिबिंब दिसत आहे. रंगाचे एक अनोखेच मिश्रण यावेळी या फोटोत पाहायला मिळाले. तिच्या चाहत्यांनाही तिच्या या हाॅट फोटोने हैरान करून सोडले आहे.
‘भगवान ने आपको बनाने में पूरा समय दिया है…’ 
सुष्मिताचा हा हाॅट फोटो पाहून तिच्या अनेक चाहत्यांना यावर कमेंट करण्याचा मोह आवरला नाही. दरम्यान काही क्षणातच हा फोटो व्हायरल झाल्याचे समजत आहे. तिच्या या बोल्ड फोटोवर तिच्या एका फॅनने असे म्हटले आहे की, ‘देवाने तुला बनवताना पूर्ण वेळ दिला आहे. बाकी मानवजातीला मात्र घाईत बनवले आहे.’ तर दुसरीकडे तिला डेट करण्याची इच्छा व्यक्त करत एका फॅनने कमेंट केली की, ‘तुम्ही खूपच वेगळ्या आहात. मी तुमच्यासोबत डेटवर येऊ शकतो का?’  आणखी एकाने म्हटले आहे की, ‘एका आकाशाला पाहून दुसरं आकाश वितळत आहे. आणि हीच या ब्रम्हांडाची सुंदरता आहे.’