बैठकीला गैरहजर राहिल्याने पिंपरी पालिकेतील दोन उपअभियंते निलंबीत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहरात पहिल्याच मुसळधार पावसामुळे थेरगांवमध्ये निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीस जबाबदार धरुन आणि महत्वाच्या विषयावर महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीस गैरहजर राहिल्याने पाणी पुरवठा व जलनिःसारण विभागाचे उपअभियंता किशोर महाजन, ग क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे विजयकुमार काळे यांच्यावर सेवानिलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सोमवारी केली.

महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यक्षेत्रात गुरुवारी (दि.21) मुसळधार पावसाने थेरगांव परिसरात रहदारी रस्त्यामध्ये पावसाचे पाणी, सांडपाणी साठल्याने स्थानिक, सोसायटी नागरिकांना आणि वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होवून आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तेथील पाणीपुरवठा, जलनिःसारण व स्थापत्य विषयक कामाची जबाबदारी उपअभियंता किशोर महाजन आणि उपअभियंता विजयकुमार काळे यांच्यावर आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या दालनात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

[amazon_link asins=’B07D66CH2T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f158271-7892-11e8-b109-6598118f568c’]

दरम्यान, त्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीला उपअभियंता किशोर महाजन, विजयकुमार काळे हे दोन्ही अधिकारीवरिष्ठांना कोणतीही पुर्वसुचना अथवा समंती न घेता विनापरवाना गैरहजर राहिले. त्यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ सेवानिलंबनाची करवाई करण्यात आली आहे.