Mumbai : डोंगरी इमारत कोसळण्याच्या प्रकरणात ‘बी’ वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांचे निलंबन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईच्या डोंगरी भागातील केसरभाई इमारत कोसळण्याची दुर्घटना काही दिवसांपूर्वीच घडली. या दुर्घटनेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने बी वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त विवेक राही यांच्या निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आधी या दुर्घटनेप्रकरणी सध्या असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करता तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र सध्या तसं न होता सध्या कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसंच हा निर्णय प्रवीणसिंह परदेशी यांनीच दिले आहेत.

केसरभाई इमारत ही चार मजली असून ती १०० वर्ष जुनी आहे. या इमारतीत १५ कुटुंब राहतात होते. या इमारतीचा अर्धाभाग कोसळला आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जण जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये ७ पुरुष, ४ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांती मदत जाहीर करण्यात आली आहे.

ही इमारत १०० वर्ष जुनी असून तीचा अतिधोकादायक इमारतींमध्ये समावेश होता. या इमारतीचे पुर्नविकासाचे काम विकासकाकडे सोपवण्यात आले होते. परंतू हे काम वेळेत न करता यासाठी दिरंगाई करण्यात आली. ही दिरंगाई का करण्यात आली, याची सखोल चौकशी करण्यात येईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसंच दोषींवरही कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले आहे.

Loading...
You might also like