IIFA Awards 2019 : ग्रीन कार्पेटवर अभिनेत्री स्वरानं चक्‍क ‘सॅन्डल’ काढून दिली ‘पोज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या बिनधास्त, बेधडक वक्तव्यांमुळे अभिनेत्री स्वरा भास्कर कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती आयफा रॉक 2019 या अवॉर्ड सोहळ्यात हाय हील्स सॅन्डल्स काढून दिलेल्या पोजमुळे चर्चेत आली आहे.

अवॉर्ड सोहळ्यात हाय हील्स सॅन्डल्समुळे स्वरा त्रस्त होती. सुरुवातीला पापाराझींना फोटोसाठी पोज देण्यासाठी ती जरा अडखळली. नंतर तिने सँडल्स काढून टाकले व मोठया आत्मविश्वासाने तीने पोज दिल्या. या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत. स्वराची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. उंच टाचांनी त्रस्त असलेल्या स्वरा भास्करच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते. व्हायरल झालेल्या फोटोंत स्वराने हातात सँडल्स काढून घेतलेली दिसत आहे.

आयफा रॉक 2019 या अवॉर्ड सोहळ्यात स्वराने आपल्या अनोख्या अंदाजाने पुन्हा एकदा सा-यांचे लक्ष वेधून घेतले. आयफा अवॉर्ड्समध्ये स्वरा भास्कर व्हाईट गाऊन परिधान केला होता. त्यावर तिने केसांचा हेयरबन घातला होता.

यंदाच्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात ‘राजी’ या चित्रपटाला या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. याच चित्रपटासाठी आलिया भट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिनेता रणवीर सिंगला ‘पद्मावत’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदा आयफा सोहळ्याला 20 वर्षे पूर्ण झाली . विशेष म्हणजे पहिल्यांदाच मुंबईत हा सोहळा आयोजित केला गेला.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like