Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Swargate Police Station | अल्पवयीन मुलाला स्मशानभूमीजवळील पत्र्याचे शेडमध्ये नेऊन तेथे गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक कृत्य करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police station) एकाला अटक केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

रवींद्र ऊर्फ बल्ली कांबळे (वय ३२, रा. डायन प्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार सेव्हन लव्ह चौक पुल ते पुनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळील पत्र्याचे शेडमध्ये मंगळवारी सकाळी घडला. याप्रकरणी एका १५ वर्षाच्या मुलाने स्वारगेट पोलिस ठाण्यात (Swargate Police station) फिर्याद दिली आहे. कांबळे याने दोन मुलांना नाष्टा करण्याच्या बहाण्याने सेव्हन लव्ह चौकातून मोटार सायकलवर बसवून पुनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळ नेले. तेथे त्यांच्यातील एकाला त्याने दारु आणण्यासाठी पाठविले.

त्यानंतर त्याने या अल्पवयीन मुलाला अनैसर्गिक कृत्य करायला सांगितले. या मुलाने त्याला विरोध केल्यावर त्याचा गळा दाबून केस ओढले. मी सांगतो तसे केले नाही तर तुला जिवंत मारुन टाकून स्मशानभूमीत पुरुन टाकीन, अशी धमकी दिली. जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा दाबून केस ओढले व त्याला अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडणे, पोक्सो अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करुन रवींद्र कांबळे याला अटक केली आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Swargate Police Station | Unnatural abuse of a minor; Threatened to kill by strangulation

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप