Swiggy IPO | IPO घेऊन येतेय स्विगी… प्लॅनिंग सुरू, लिस्टिंगसाठी ठरले हे टार्गेट

नवी दिल्ली : Swiggy IPO | सॉफ्टबँक (SoftBank) फंडिंगवाली फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) शेयर मार्केट (Share Market) मध्ये लिस्टिंगची तयारी करत आहे. कंपनीने स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. (Swiggy IPO)

स्विगीने बाजार कमजोर असल्याने काही महिने ही प्रक्रिया थांबवली होती. आता कंपनीने व्हॅल्यूएशनचे मुल्यांकन करण्यासाठी बँकर्ससोबत चर्चा सुरू केली आहे. रेस्टॉरंटमधून फूड डिलिव्हरी (Food Delivery) तसेच ग्रोसरी प्रॉडक्ट्स घरोघरी पोहचवणार्‍या स्विगीचे व्हॅल्यूएशन २०२२ मध्ये शेवटच्या फंड रेजिंग दरम्यान १०.७ अरब डॉलर होते.

स्विगीने थांबवला होता IPO चा प्लान
रॉयटर्सने सूत्रांच्या संदर्भाने सांगितले की, मागील वर्षी भारतीय स्टार्टअप्ससाठी फंडिंगच्या बाबतीत विंटरसारखी स्थिती दिसून आली होती. फंडिंगची कमतरता आणि व्हॅल्यूएशनच्या बाबतीत गुंतवणुकदारांच्या वाढत्या चिंतेच्या दरम्यान स्विगीने आपली आयपीओ योजना थांबवली होती.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जागतिक आणि भारतीय बाजारात तेजी आली आहे, स्विगीने सप्टेंबरच्या सुरुवातीला आयपीओवर काम करण्यासाठी आठ गुंतवणुकदार बँकांना निमंत्रित करून आपल्या आयपीओच्या योजनेला पुन्हा गती दिली आहे. यामध्ये मॉर्गन स्टेनली, जेपी मॉर्गन आणि बँक ऑफ अमेरिका यांचा समावेश आहे.

फंडिंगसाठी व्हॅल्यूएशन
आयपीओसाठी प्लानिंगच्या प्रोसेसमध्ये थेट सहभागी रॉयटर्सच्या एका सूत्राने सांगितले की, स्विगी आयपीओ
(Swiggy IPO) योजनेसाठी बेंचमार्क म्हणून १०.७ बिलियन डॉलरच्या अंतिम फंडिंग राऊंडच्या व्हॅल्यूएशनचा वापर करत आहे.

मात्र, कंपनीने आतापर्यंत संभाव्य भागीदारी विक्री अथवा अंतिम व्हॅल्यूएशनवर निर्णय घेतलेला नाही.
स्विगीमधील एक छोटी शेयरधारक इनव्हेस्कोने मे महिन्यात कंपनीचे मूल्यांकन सुमारे ५.५ बिलियन डॉलर केले होते.

भारतीय बाजारात वाढतोय गुंतवणुकदारांचा विश्वास
स्विगीने सुरुवातीला आयपीओद्वारे ८०० मिलियन डॉलर ते एक बिलियन डॉलर जमवण्याचा विचार केला होता,
असे २०२२ च्या सुरुवातीला यावर काम करणाऱ्या बँकिंग सूत्राने रॉयटर्सला सांगितले.

तीन सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की, स्विगीचे लक्ष्य जुलै-सप्टेंबर २०२४ च्या दरमयान लिस्टिंग करण्याचे आहे.
स्विगीचे प्रतिस्पर्धी झोमॅटोच्या शेअरमध्ये यावर्षी आतापर्यंत ५४.८ टक्के वाढ झाली आहे.
गुंतवणुकदारांचा विश्वास भारताच्या आर्थिक बाजरात परतत असल्याचा हा संकेत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | वाढदिवसाचा केक न स्वीकारल्याने तरुणीला घरात घुसून मारहाण, एकतर्फी प्रेमातून तरुणाचे कृत्य; कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटी मधील घटना