Swords and Shield Symbol | शिंदेंचे चिन्ह वादात; ’ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East by-Election) निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह (Swords and Shield Symbol) दिले आहे. आता हे चिन्ह वादात सापडले आहे. कारण या चिन्हावर नांदेडच्या शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर (Ranjit Singh Kamthekar) यांनी याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले आहे. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याने शिवसेनेला ते नाकारले, याप्रमाणेच ढाल-तलवार (Swords and Shield Symbol) हेदेखील खालसा पंथाचे धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगाने द्यायला नको होते. या संदर्भातील निर्णय न झाल्यास रणजीत सिंह न्यायालयात जाऊ शकतात.

सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे (Sachkhand Gurdwara Board) माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी मागणी केली आहे की, खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे ढाल-तलवार चिन्ह (Swords and Shield Symbol) मिळते-जुळते असल्याने त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये. याबाबतचे निवेदन त्यांनी आयोगाला पाठवले आहे.

शिंदे गटासाठी अंधेरी पोटनिवडणूक राजकीय भवितव्य ठरवणारी ठरणार होतील.
पण शिंदे गटाने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात न उतरवता भाजपला (BJP) ही जागा दिली. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिंदे गटाने ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचे झाड असे तीन पर्याय आयोगाकडे चिन्हासाठी सादर केले होते.
त्यातील ढाल-तलवार शिंदे गटाला मिळाले. शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि ढाल आहे.
तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटाने पहिल्या पसंतीस दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाने हे चिन्ह नाकारले.
(rising sun) उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो हे कारण आयोगाने सांगितले.
उगवता सूर्य हे डीएमके पक्षाचे (DMK Party) चिन्ह आहे. तर मिझोराम नॅशनल पक्षाचे
(Mizoram National Party) देखील उगवता सूर्य चिन्ह आहे. आता शिंदे गटाच्या ढाल तलवार चिन्हावरून वाद
होऊ शकतो.

Web Title :- Swords and Shield Symbol | sikh community opposes eknath shindes 2 swords and shield symbol after thackeray symbol controversy andheri east bypoll

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari | गडकरींनी काढली परखड शब्दांत खरडपट्टी, म्हणाले – ‘आमदार, खासदार, अधिकार्‍यांकडून विकासकामांत अडथळा’

Jayant Patil | जयंत पाटलांनी केली पदाधिकार्‍यांची कान उघडणी, कुणाकुणाची अब्रू घालवणार, चोपडा मतदारसंघ सोडून द्यायचाय का?