पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lions Senior Trophy T-20 | लायन्स् क्लब पुणे (Loins Club Pune) रहाटणी तर्फे लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा मोशी येथील हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स् येथील मैदानावर होणार आहे. (Lions Senior Trophy T-20)
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना लायन्स् क्लब पुणे रहाटणीचे अध्यक्ष धीरज कदम व कन्व्हेनर विजय कोतवाल यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत एकूण ८ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. ४० वर्षावरील खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत. ही स्पर्धा लायन सागर ढोमसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष आहे. (Lions Senior Trophy T-20)
गतविजेते दिक्षित रॉयल्स्, बाश्री ब्लास्टर्स, पासलकर रॉयल्स्, लवास रॉयल्स्, डिएमटीसी अँड न्युक्लियस इलेव्हन, नवले वॉरीयर्स, गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी, स्वयुश स्ट्रायकर्स या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन गुरूवार, २ फेब्रुवारी रोजी डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ क्लबचे क्रिकेटचे अध्यक्ष अभिषेक मोहीते,
समीर अगरवाल, हेमंत रसाळ आणि क्लबच्या सदस्यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचा अंतिम सामना आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे.
विजेत्या संघाला करंडक तर, उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे.
याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि
प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०२१ स्पर्धेत आणि गतवर्षी (२०२२) दिक्षित रॉयल्स् संघाने विजेतेपद तर,
दादाज् इलेव्हन संघाने उपविजेतेपद मिळवले होते.
Web Title :- T-20 | In memory of Lion Sagar Dhomse, ‘Lions Senior Trophy’ T-20 Cricket 2023 tournament will be organized from February 2!
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update