NCP MLA Rohit Pawar | ‘बागेश्वर बाबाला उपरती झाली, पण मुंबईत बसलेल्या बाबाला…’ रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी आपले विधान मागे घेत माफी मागितली आहे. तुकारामांना त्यांची पत्नी मारहाण करत होती म्हणून ते भक्तीमार्गाला लागले, असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले. दरम्यान, शास्त्रींनी त्यांचे वक्तव्य मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी धिरेंद्र शास्त्री आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना टोला लगावला आहे. रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी याबाबत ट्विट केले आहे.

 

रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी ट्विटरवरुन धिरेंद्र शास्त्री आणि राज्यपाल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की,’बागेश्वर बाबाला उपरती झाल्याने त्याने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांबद्दलचं विधान मागे घेतलं…. पण मुंबईत समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या बाबाला परतीचे वेध लागले तरी उपरती होत नाही, हे दुर्दैव आहे!’ राज्यपालांचा बंगला मुंबईत मलबार हिल (Malabar Hill) येथे समुद्र किनाऱ्यावर आहे. त्यामुळे रोहित पवारांनी नाव न घेता राज्यपालांना टोला लगावला आहे.

दरम्यान, अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मुंबई दौऱ्यावर आले होते.
त्यावेळी राज्यापालांनी आपल्याला राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली होती.
मात्र, त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे ते सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.
आमदार रोहित पवार यांनी देखील आज राज्यपालांना नाव न घेता टोला लगावला आहे.

 

Web Title :- NCP MLA Rohit Pawar | rohit pawar slams dhirendra shastri for tukaram comment and bhagat singh koshyari over resignation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime News | दुसऱ्या तरुणासोबत का बोलतेस म्हणत महिलेचा विनयभंग, भोसरी परिसरातील घटना

Budget 2023 | ‘या’ आहेत मोदी सरकारच्या शिक्षणक्षेत्रासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी

Mumbai Championship League T-20 | ‘मुंबई चॅम्पीयनशीप लीग’ ट्वेन्टी-२०’ अजिंक्यपद जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !!