T10 League | मुंबई इंडियन्सच्या ‘या’ माजी बॉलरने इतिहास रचत 12 बॉलमध्ये घेतल्या 5 विकेट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – T10 League | क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे. क्रिकेटचे स्वरूप जसजसे छोटे होत आहे तसतसे 5 विकेट्स घेणे अधिक आव्हानात्मक असते. या आव्हानात्मक प्रकारातही क्रिकेटपटू अधिक जिद्दीनं बॉलिंग करत नवे रेकॉर्ड करत आहेत.अबू धाबीमध्ये (Abu Dhabi) सध्या T10 लीग (T10 League) सुरु आहेत. या लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) माजी बॉलरनं फक्त 12 बॉलमध्ये 5 विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फास्ट बॉलर मर्चंट डी लँगने (Marchant de Lange) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये दोन ओव्हर्स म्हणजेच 12 बॉलमध्ये 5 विकेट्स घेत इतिहास घडवला आहे.

 

T10 लीगमध्ये (T10 League) 5 विकेट्स घेणारा पहिला फास्ट बॉलर बनला आहे. याअगोदर भारताच्या प्रवीण तांबेनं (Pravin Tambe) 2018 साली सिंधीज टीमकडून खेळताना केरला नाईट्स (Kerala Knights) विरुद्ध फक्त 2 ओव्हरमध्ये हॅट्ट्रिकसह 5 विकेट्स घेतल्या होत्या. या लीगमध्ये अबू धाबीकडून खेळताना डी लँगने हा विक्रम केला आहे. अबू धाबीने दिलेल्या 146 रनचा पाठलाग करताना बांगला टायगर्सची (Bangla Tigers) सुरूवात खराब झाली. मर्चंट डी लँगनं दुसऱ्याच ओव्हरमध्ये बांगला टीमचा कॅप्टन फाफ ड्यू प्लेसिसला (Faf du Plessis) शून्यावर आऊट केलं. त्यानंतर त्यानं आंद्रे फ्लेचर (Andre Fletcher), हजरतउल्लाह जजई (Hazratullah Jajai), बेनी हॉवेल (Benny Howell) आणि जेम्स फॉकनर (James Faulkner) यांना आऊट केलं. लँगच्या या भेदक माऱ्यापुढे बांगलाची टीम 10 ओव्हरमध्ये 8 आऊट 106 पर्यंतच मजल मारू शकली. त्यामुळे अबू धाबीला मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात यश आले.

 

 

दक्षिण आफ्रिकेचा डी लँग हा यापूर्वी आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.
त्यानं 5 आयपीएल मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 2011 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
त्याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत 2 टेस्ट, 4 वन-डे आणि 6 टी20 सामने खेळले आहेत.
त्याने आतपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 26 विकेट्स घेतल्या आहेत. तर 122 टी20 मॅचमध्ये 141 विकेट्स घेतल्या आहेत.

 

Web Title :- T10 League | t10 league marchant de lange became only 2nd player after pravin tambe to take a 5 wicket haul in t10 cricket marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा