T20 WC 2024 | ‘रोहित शर्मा नाही तर विराट कोहली खेळणार पुढचा टी-20 वर्ल्डकप; ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी

पोलीसनामा ऑनलाईन : टीम इंडियाने आतापासूनच 2024 (T20 WC 2024) मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संघबांधणीला सुरुवात केली आहे. या संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांड्या करणार आहे. त्यातच आता माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने या टी-20 विश्वचषकातील (T20 WC 2024) विराट आणि रोहितच्या सहभागाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

काय म्हणाला वसीम जाफर?
वसीम जाफरने कर्णधार रोहित शर्मा पुढील टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार नसल्याची मोठी भविष्यवाणी केली आहे. तसेच विराट कोहली या आयसीसी स्पर्धेत शेवटच्या वेळी खेळताना दिसणार आहे. मागच्या टी-20 विश्वचषक (T20 WC 2024) स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती. हा वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला होता. कोहलीने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. पण भारताल इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने, भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

वसीम जाफर पाकिस्तानी माजी क्रिकेटर बासित अलीच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले
कि ”मोठ्या स्पर्धा पाहता विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामने येत आहेत, त्यानंतर आयपीएल आहे. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक.
भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो.
भविष्याकडे पाहता हा खेळ (टी-20) तरुणांसाठी आहे.
त्यामुळे विराट कोहली खेळू शकतो, पण रोहित शर्मा पुढचा हंगाम नक्कीच खेळणार नाही.
तो आधीच 36 वर्षांचा आहे असे वसीम जाफर म्हणाले.

Web Title :- T20 WC 2024 | wasim jaffers prediction rohit sharma will not play in the next t20 world cup 2024 virat kohli will play

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई ! खडक, भारती विद्यापीठ, सहकारनगर, अलंकार, उत्तमनगर, दत्तवाडी, वानवडी, हडपसर, कोंढवा, लोणी काळभोर परीसरात गुटखा विक्री करणाऱ्या 11 जणांना अटक

Kolhapur Crime News | दुर्दैवी ! खेळत असताना पिठात पडल्यामुळे नाकातोंडात पीठ जाऊन 9 महिन्यांच्या बालकाचा अंत

Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ; पत्नीच्या आरोपांनंतर कोर्टाने बजावली नोटीस