T20 World Cup | “…तर भारत उपांत्यफेरीत खेळण्याच्या लायक नाही; इरफान पठाणने व्यक्त केले रोखठोक मत

पोलीसनामा ऑनलाईन : भारताचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसंदर्भात आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. भारत आपल्या अंतिम सामन्यामध्ये झिम्बाब्वेला (Zimbabwe) पराभूत करू शकला नाहीतर भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करता येणार नाही. यादरम्यान झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हरल्यास भारत खरोखरच उपांत्यफेरीत खेळण्यासाठी लायक संघ (T20 World Cup) नाही असे रोखठोक मत इरफान पठाणने (Irfan Pathan) व्यक्त केले.

रविवारी सुपर 12 फेरीमधील भारताचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. मेलबर्नलच्या मैदानावर (Melbourne Ground) हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारताला उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी हा सामना कोणत्याही परीस्थित जिंकणे महत्वाचे असणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत गट फेरीमध्ये आपलं पहिलं स्थान निश्चित करेल. या सामन्याबद्दल इरफान पठाणने आपलं स्पष्ट मत मांडलं. या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास भारत उपांत्यफेरीच्या दर्जाचा संघ नसेल असे इरफान पठाण म्हणाला आहे. (T20 World Cup)

या सामन्याबद्दल बोलताना इरफान पठाण म्हणाला कि, सध्याच्या झिम्बाब्वेच्या संघाची गोलंदाजी उत्तम असली
तरी त्यांची फलंदाजी फारशी प्रभावी नाही. त्यामुळे हा सामना मोठ्या फरकाने जिंकला पाहिजे,”.
हा सामना भारताने हलक्यात घेता कामा नये असाही सल्लादेखील त्याने रोहित शर्माच्या
(Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाला दिला आहे.

Web Title :-  T20 World Cup | india vs zimbabwe t20 wc irfan pathan says if rohit sharma lead fail to defeat zimbabwe they do not deserve place in semi finals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Khaire | काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या विधानाबाबत चंद्रकांत खैरेंची दिलगिरी, म्हणाले…

NCP Chief Sharad Pawar | हाताला पट्टी अन् कातर झालेला आवाज, शरद पवारांनी ‘मंथन शिबिरा’ला लावली हजेरी (व्हिडिओ)