T20 World Cup | सेमी फायनलमध्ये पाऊस पडला ‘या’ प्रकारे जाहीर करण्यात येणार विजेता, आयसीसीचे नवीन नियम

पोलीसनामा ऑनलाईन : आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup) आता सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये (T20 World Cup) भारताचा (India) इंग्लडबरोबर (England) तर पाकिस्तानचा (Pakistan) न्यूझीलंड (New Zealand) बरोबर सामना होणार आहे. सुपर 12 फेरीत अनेक संघांचा खेळ पावसानं खराब केल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे आता जर सेमी फायनलमध्येही तसंच झालं तर विजेता कसा ठरणार असा प्रश्न सर्वाना पडला असेल. त्यासाठी आयसीसीने (ICC) अगोदरच नियम बनवून ठेवले आहेत.

काय आहे नियम?
सेमी फायनलमध्ये जर पाऊस पडला तर काही वेळ पाऊस थांबण्याची वाट बघितली जाईल. यानंतर मैदानाची पाहणी करून तो सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. मात्र जर पाऊस कायम राहिला तर हा सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. आयसीसीने पावसाची शक्यता लक्षात घेऊन सेमी फायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस राखून ठेवला आहे.

जर सेमी फायनलच्या राखीव दिवशीही पाऊस पडला तर काय होणार…
सेमी फायनलसाठी आयसीसीने राखीव दिवस (Reserve Day) ठेवला खरा मात्र त्या दिवशीदेखील पाऊस पडला तर काय होणार ? याचादेखील नियम आयसीसीने बनवला आहे. जर राखीव दिवशीही पाऊस पडला तर मात्र गुणतालिकेत ज्या संघाचे गुण जास्त असतील त्या संघाला फायनलमध्ये प्रवेश दिला जाईल. जर दोन्ही संघाचे गुण सारखे असतील तर रन रेटच्या आधारे संघाला फायनलमध्ये प्रवेश दिला जाईल. याचा अर्थ भारताला याचा फायदा होऊ शकतो.

फायनलचं काय?
जर फायनलमध्ये (T20 World Cup) देखील पावसामुळे सामना होऊ शकला नाहीतर आयसीसीच्या नियमानुसार
अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन संघांपैकी जो सुपर 12 मध्ये अव्वल असेल त्या संघाला विजेतेपद देण्यात येईल.
त्यामुळे दोन्ही ठिकाणी भारतीय संघाला हा नियम फायद्याचा ठरणार आहे. कारण ग्रुप 2 मध्ये 5 पैकी 4
सामने जिंकून टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे.

Web Title :- T20 World Cup | what will happen if it rains in the semi final of t 20 world cup know the new rule of icc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup 2022 | विराट कोहलीने पहिल्यांदाच पटकावला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार

Abdul Sattar | अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, 24 तासात हकालपट्टी करा अन्यथा…; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा