‘मला तो अवयव सर्वाधिक आवडतो’ : तापसीच्या उत्तराने उडला गोंधळ 

मुंबई : वृत्तसंस्था – बेधडक भूमिका साकरणारी अभिनेत्री अशी अोळख असणारी तापसी पन्नू आपल्या भूमिकांसोबतच सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. ती तिच्या खऱ्या आयुष्यातही हजरजबाबीही आहे हे तिने पुन्हा दाखवून दिले आहे. ‘पिंक’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’ या चित्रपटांमध्ये तिने ज्याप्रकारे धाडसी भूमिका साकारल्या तशीच ती खऱ्या आयुष्यात आहे असे उदाहरण समोर आले आहे. . सोशल मीडियावर अश्लिल कमेंट करणाऱ्याला तिने सडेतोड उत्तर दिलं असून तिच्या उत्तरातील एक शब्द गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेल्याचे समोर आले आहे.

एका ट्विटरवरील युजरने ‘मला तुझ्या शरीराचे अवयव आवडतात,’ अशी कमेंट तापसीला केली. यावर तापसीने हजरजबाबीपणा दाखवत साहसी आणि रोकठोक उत्तर दिले. ती म्हणाली की, ‘अरे वाह! मला पण आवडतात. पण तुम्हाला कोणता आवडतो, मला ‘सेरेब्रम’ आवडतो.’ तापसीने दिलेल्या या रोकठोक उत्तराने त्या कमेंट करणाऱ्या व्यक्तीचं तोंडच बंद केलं. इतकंच नाही तर तापसीने दिलेलं हे उत्तर चांगलंच चर्चेतही आलं. मुख्य म्हणजे तिने ट्विटरवरील दिलेल्या या उत्तरातील ‘सेरेब्रम’ म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला.

यानंतर गोंधळलेल्या नेटकऱ्यांनी हा शब्द गुगलवर सर्च केला. त्यावेळी  २४ तासांत गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला हा शब्द ठरल्याचे दिसून आले. ‘सेरेब्रम’ म्हणजे मोठा मेंदू होय. एका नेटकऱ्याने गुगल सर्चचा स्क्रिनशॉट शेअर करत तापसीला टॅग केलं. नेटकऱ्यांनी तापसीच्या या उत्तराचं कौतुकसुद्धा केलं.