Video : तापसी पन्नूनं शेअर केली ‘रश्मी रॅकेट’ची झलक, टफ ट्रेनिंगमध्ये चालणंही झालं होतं अवघड ! थांबवावी लागली होती शुटींग

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिनं तिच्या आगामी सिनेमाची शुटींग सुरू केली आहे. रश्मी रॅकेट (Rashmi Rocket) असं या सिनेमाचं नाव आहे. अलीकडेच तापसीनं या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला होता. सिनेमात तापसी अ‍ॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं डायरेक्शन आकर्ष खुराना (Akarsh Khurana) करणार आहे.

अ‍ॅथलीटचा रोल चांगल्या प्रकारे साकारण्यासाठी तापसी खूपच मेहनत करताना दिसत आहे. तिनं ट्रेनिंगचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. सिनेमाप्रति तिचं समर्पण यात स्पष्ट दिसत आहे. तापसीनं तिच्या चाहत्यांसाठी आता ट्रेनिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिचे अनुभव देखील सांगत आहे.

रश्मीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, हे खूप पेनफुल होतं. शुटींगच्या तिसऱ्याच दिवशी माझं शरीर खूप वैतागलं होतं. मला धावताही येत नव्हतं. मला शुटींग थांबवावं लागलं जेणेकरून मला चालता येईल. मला सिनेमासाठी जीममध्ये खूप मेहनत घ्यावी लागली आहे.

सिनेमाबद्दल आणखी बोलायचं झालं तर सिनेमाची निर्मिती रॉनी स्क्रूवालानं केली आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. तापसीनं शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठू मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर मिताली राजचं बायोपिक आहे. याशिवाय हसीन दिलरूबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत. लूप लपेटा, रश्मी रॅकेट हे सिनेमेही तिच्याकडे आहेत. रश्मीचा रॅकेटचा फर्स्ट लुकही समोर आला आहे.