‘बॅक टू बॅक’ दुसऱ्या दिवशी तापसीनं शेअर केला ‘थप्पड’ चा फर्स्ट लुक, म्हणाली- ‘प्रेमात हे गरजेचं आहे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक असणाऱ्या तापसी पन्नूकडे 2020 मध्ये सिनेमांची भरभराट असल्याचं दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी तापसीनं आपल्या आणखी आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. थप्पड – बस इतनी सी बात असं या सिनेमाचं नाव आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये असं वाटत की आहे की, कोणीतरी तिला चापट मारली आहे. तिच्या एक्सप्रेशनवरूनही ते सहज लक्षात येत आहे. थप्पडचा ट्रेलर 31 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. तर 28 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पोस्टरमध्ये खास काय ?
सिनेमातील आपला फर्स्ट लुक शेअर करताना तापसी म्हणते, “ही एवढीशी गोष्ट आहे का ? प्रेमात हे योग्य आहे का ? ही थप्पडची पहिली झलक आहे.” अनुभव सुशीला सिन्हा थप्पड सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. पोस्टरची खास बात अशी आहे की, सर्व पुरुषांच्या नावानंतर त्यांच्या आईचं नाव लिहिलं गेलं आहे. मसलन भूषण सुदेश कुमार, कृष्ण कृष्णा कुमार आणि अनुभव सुशीला सिन्हा.

तापसीच्या शाबाश मिथु सिनेमाचं पोस्टरही नुकतचं रिलीज करण्यात आलं होतं. टेस्ट इंडियन क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजचं हे बायोपिक आहे. या सिनेमाच्या फर्स्ट लुकमध्ये तापसी पुल शॉट मारताना दिसत होती. पुढील वर्षी म्हणजे 5 फेब्रुवारी 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. राहुल ढोलकिया सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.