‘सांड की आंख’ नंतर मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करणार तापसी पन्नू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये बायोपिकची लाईनच लागली आहे. एकापाठोपाठ एक बायोपिक्स बनताना दिसत आहेत. रणवीर सिंग कपिल देव यांच्यावरील बायोपिकमध्ये काम करत आहे. तर सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये परिणीती चोपडा काम करत आहे. लवकरच तापसी पन्नूचा सांड की आंख हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात तपासी 85 वर्षांच्या शुटर आजीची भूमिका साकारली आहे. यानंतर ती एका बायोपिकमध्ये काम करणार आहे. महिला क्रिकेट टीमची टेस्ट आणि वन डेची कॅप्टन मिताली राजचं हे बायोपिक असणार आहे.

image.png

तापसी पन्नू हॉकी प्लेयर संदीप सिंह यांच बायोपिक सूरमा मध्ये दिसली आहे. यात तिने एका हॉकी प्लेयरची भूमिका साकारली आहे. या सिनेमात दिलजीत दोसांझ लिड रोलमध्ये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तापसीला पूर्ण अपेक्षा आहेत परंतु दिग्दर्शकांकडून आणखी हे फायनल झालेले नाही असेही समजत आहे. या सिनेमाची स्क्रिप्ट मात्र रेडी आहे. पुढील वर्षी या सिनेमाची शुटींग सुरु होईल अशी आशा आहे. यासाठी तापसी क्रिकेटचे ट्रेनिंगही घेत आहे.

मिताली राज विषयी थोडक्यात…

– मिताली राज टेस्ट क्रिकेटमध्ये डबल सेंचुरी मारणारी पहिली महिला क्रिकेटर आहे.
– 3 डिसेंबर 1982 रोजी राजस्थानच्या जोधपूरमध्ये तिचा जन्म झाला आहे. पहिल्यांदा तिने भरतनाट्यममध्ये ट्रेनिंग घेतली आहे. क्रिकेटसाठी तिने भरतनाट्यम मध्येच सोडून दिलं.
– मितालीच्या आईचं नाव लीला राज आहे तर विडलांचं नाव धीरज आहे. तिचे वडिलही आधी क्रिकेटर राहिले आहेत. यामुळे तिला खूप प्रोत्साहन मिळाले आहे.

image.png

– हैद्राबादमध्ये 1999 मध्ये वन डे इंटरनॅशनल मॅच झाली. त्यात मितालीने पहिल्यांदा भाग घेतला होता. यात तिने नाबाद 114 धावा केल्या होत्या.

– मिताली वन डे क्रिकेटच्या इतिहासमध्ये 6000 धावा बनवणारी पहिली महिला क्रिकेटर आहे.
– मितालीला 2015 मध्ये पद्मश्री आणि 2003 मध्ये क्रिकेटसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.

मिताली राज आपल्या बायोपिक बद्दल बोलताना एका मुलाखतीत बोलताना म्हणाली की, “माझ्या बायोपिकमध्ये जी कोणी माझी भूमिका साकारेल, तिला क्रिकेटची चांगली माहिती असणं गरजेचं आहे. माझी भूमिका साकारणं लोकांसाठी नक्कीच आव्हान असणार आहे.”

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई