पीएमपीच्या बडतर्फ चालकांना सेवेत घ्या; न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

पीएमपीमधील बदली, हंगामी, रोजंदारीवरील बडतर्फ करण्यात आलेल्या १३१ चालकांना पुन्हा सेवेत घ्यावे असा आदेश कामगार न्यायालयाने दिला आहे.

पीएमपीमधील बदली, हंगामी, रोजंदारी पध्दतीने नियुक्त केलेल्या १५८ चालकांना पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी बडतर्फ केले होते . त्यापैकी १३१ चालकांनी पीएमपी कामगार संघ इंटककडे दाद मागितली होती . इंटकने प्रशासनाशी पत्रव्यवहार केला मात्र त्याला प्रतिसाद देण्यात आला नाही . त्यानंतर इंटकने कामगार न्यायालयाकडे धाव घेऊन दावा दाखल केला होता . त्यावर न्यायालयाने आदेश दिला अशी माहिती इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे आणि सरचिटणीस नरुद्दीन इनामदार यांनी दिली .आता आदेशानुसार १३१ चालकांना सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी इंटकने केली आहे