‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – डोकेदुखी, कंबरदुखी अथवा अन्य कोणत्याही छोट्या दुखण्यात लगेचच पेनकिलर घेण्याची अनेकांना सवय असते. थोडी सुद्धा वेदना सहन केली जात नाही. ही सवय कधीकधी त्रासदायक ठरू शकते. शिवाय डॉक्टरांना न विचारता मेडिकलमधून पेनकिलर विकत घेऊन ती घेणे कधीकधी जीवघेणे ठरू शकते. पेनकिलर घेण्यापूवी काही काळजी घेतली पाहिजे. आपण नियमित कोणती औषणे घेतो, मद्यपान केले आहे की, हा विचार पेनकिलर घेताना केला पाहिजे. अन्यथा पेनकिलर घेणे खूप धोकादायक ठरू शकते.

पेनकिलर घेण्यापूर्वी अशी घ्या काळजी

* पेनकिलरच्या गोळ्यांची सवय लावून घेऊ नका

* दारू आणि पेनकिलर एकत्र घेणे हे धोकादायक असते

* तुम्ही घेतल असलेल्या गोळ्यांची माहिती डॉक्टरांकडून करून घ्या

* दोन दिवसांपेक्षा जास्त दुखणे सुरू असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे

* रिकाम्यापोटी कोणतीही गोळी घेऊ नये

* गोळी घेताना भरपूर पाणी प्यावे

आरोग्य विषयक वृत्त –

वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांच्या श्वसनविकारमध्ये वाढ

बिहारमध्ये इन्सेफेलाइटिस आजाराने १९ मुलांचा मृत्यू

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

मेट्रोच्या कामामुळे मंत्रालय परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

You might also like