Talegaon Dabhade News | बंदी असलेली कासवे पाळल्याने तळेगाव दाभाडे येथील हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा दाखल

मावळ: Talegaon Dabhade News | बंदी असलेली कासवे पाळल्याने तळेगाव दाभाडे येथील एक हॉटेल व्यावसायिक अभिजित राजेंद्र पठारे Abhijit Rajendra Pathare (वय ३०, रा. काळे मळा, चांदोली खुर्द, ता. आंबेगाव) याच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Pune Hotel Owner Detained for Illegal Possession of Protected Turtle)

पाठीवर शेल सारखे कवच असलेल्या कासवांना पाळणे गुन्हा आहे. संबंधित हॉटेलमध्ये कासवे पाळली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यांनतर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली.(Talegaon Dabhade News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही कासवे मौजे तळेगाव येथील मनोहरनगर परिसरात श्रीशा हॉटेलमधील फिश टँकमध्ये विनापरवाना ठेवलेली होती. धाड टाकत तत्काळ या वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले.

मानद वन्यजीव रक्षकआदित्य परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याचे मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण,
उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र
अधिकारी एच. ए. जाधव व वन परिमंडळ अधिकारी मल्लिनाथ हिरेमठ, वनरक्षक योगेश कोकाटे, परमेश्वर कासुळे
व जांभूळकर यांच्या पथकाने धाड टाकत ही कारवाई केली आहे.

” हे कासव आकाराने एक ते दिड फुटांपर्यंत मोठे होतात आणि त्यांचे वजन २५ किलोपर्यंत असते.
अशा कासवांना पाळणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी असे कृत्य करू नये” अशी प्रतिक्रिया आदित्य परांजपे ,
मानद वन्यजीव रक्षक, पुणे यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)