Actress Tamanna Bhatia | अखेर अभिनेत्री तमन्नाने दिली प्रेमाची कबुली; सिनेविश्वातील बॉयफ्रेंडचे नाव सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन – Actress Tamanna Bhatia | बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने अखेर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अभिनेत्री तमन्ना आणि ‘दहाड’ अभिनेता विजय वर्मा (Actor Vijay Verma) यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक महिन्यांपासून चालू होत्या. अखेर या चर्चेला स्वत: तमन्नाने (Actress Tamanna Bhatia) थांबविले असून आपण प्रेमात आहे अशी कबुली तिने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी तमन्ना आणि विजय हे गोव्यातील (Goa) एका पार्टीमध्ये स्पॉट झाले होते. या पार्टीचा त्यांचा व्हिडिओ फार व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते एकमेकांना किस करताना दिसत होते. तेव्हा पासून या दोघांच्या अफेअरस् च्या चर्चा रंगत होत्या. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसत असले तरी त्यांनी या नात्याबद्दल खुलासा केला नव्हता. आता मात्र तमन्नाने मौन सोडून आपल्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. (Tamanna Bhatia And Vijay)

एका मुलाखतीमध्ये तमन्नाला तिच्या रिलेशनशिपबाबत विचारले असता तमन्नाने ती प्रेमात असल्याचे सांगितले. पुढे ती म्हणाली की, “मला नाही वाटत की तो तुमचा सहकलाकार आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होता. आजपर्यंत मी अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण जेव्हा तुम्ही त्या संबंधित व्यक्तीच्या प्रेमात पडता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या अधिक जवळ जाता. ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे”.

विजय वर्मासोबतच्या नात्याबद्दल दोजोरा देताना तमन्ना म्हणाली की,”माझं आणि विजयचं नातं अत्यंत खास आहे. भारतात जोडीदारासाठी अनेक गोष्टींमध्ये बदल करावा लागतो. पण विजयने मला मी जशी आहे तसं स्वीकारलं आहे. तो माझी खूप काळजी घेतो. विजय आता माझ्या आनंदाचं कारण बनला आहे”.

अभिनेत्री तमन्ना आणि अभिनेता विजय यांची भेट ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली असून तिथेच त्यांची मैत्री झाली. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत असून त्यांच्या या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा (Amit Rabindranath Sharma), कोंकणा सेन शर्मा (Konkana Sen Sharma), आर बाल्कि (R. Balki) आणि सुजॉय घोष (Sujoy Ghosh) यांनी केले आहे. लवकरच ही जोडी पडद्यावर येणार असून रिअल लाईफमध्ये ते आता कपल झाले आहेत. आता त्यांचे हे नाते लग्नाच्या बंधनात अडकणार का यांकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया (Actress Tamanna Bhatia) हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मुळची दाक्षिणात्य अभिनेत्री असलेल्या तमन्नाने बॉलीवुडमध्येही (Bollywood) आपली स्वतंत्र ओळख निर्माण
केली आहे. तमन्नाचे बाहुबली (Bahubali), के.जी.एफ1(KGF1), हिंमतवाला (Himmatwala),
एंटरटेंनमेंट (Entertainment), बबली बाउंसर (Bubbli Bouncer) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम
केले आहे. तर अभिनेता विजय वर्मा गली बॉय (Gully Boy) व आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत डार्लिंग (Darling)
चित्रपटात झळकला होता. त्यानंतर तो दहाड (Dahad), मिर्झापूर (Mirzapur) या वेब सिरीजमध्ये त्याने काम केले आहे.

Web Title :  Tamanna Bhatia | tamanna bhatia vijay varma relationship tamannaah bhatia finally confirms dating vijay varma

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’; फडणवीसांपेक्षा, शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेनेकडून जाहिरातबाजी

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भडका ! होरपळून 3 ठार तर तिघे जखमी; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प

Maharashtra Cabinet Decision | पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ