Tamanna Bhatia | तमन्ना भाटिया व विजयचे अफेअर खरंच प्रेम होतं की फक्त पब्लिसिटी स्टंट? नेटकऱ्यांचा सवाल

Tamanna Bhatia | tamannaah bhatia vijay verma affair was a publicity stunt for lust stories 2 here is the truth
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन – लस्ट स्टोरीज् 2 चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलेले बी टाऊन मधील आणखी एक हॉट कपल अभिनेत्री तम्मना भाटिया (Tamanna Bhatia) व अभिनेता विजय वर्मा हे लाईमलाईटमध्ये आहेत. विजय व तमन्ना (Vijay Varma And Tamanna) या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) च्या प्रमोशनवेळी या कपलने एकमेंकाच्या प्रेमात बुडाले असल्याचे सांगितले होते. मात्र हे सर्व चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फक्त पब्लिसिटी स्टंट (Tamanna Affair Publicity Stunt) होता का असा सवाल आता विचारला जात आहे. यावर अभिनेता विजय वर्मा याने उत्तर दिले आहे.

 

 

 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता विजय वर्माला हे नक्की प्रेम आहे की फक्त पब्लिसिटी स्टंट असा सवाल करण्यात आला. यावर विजयने खरेखुरे उत्तर दिले आहे. विजय म्हणाला की, “आम्ही दोघे आजही एकमेकांना डेट करत आहोत. दोघेही एकत्र खूप आनंदी आहेत. मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे. मी सांगितले आहे की आता माझा विलन असेलेली वेळ संपली आहे, आता मी रोमान्सच्या फेज मध्ये आहे.”

 

या आधी देखील नेटकऱ्यांनी तमन्ना व विजयच्या प्रेमावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळीही तमन्नाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते. अभिनेत्री तमन्नाने आपल्या प्रेमाची कबुली (Tamanna Affair) सर्वांसमोर दिली होती. तमन्ना म्हणाली होती की, “मला असे वाटते की तुम्ही फक्त एखत्र काम करत आहात आणि तो तुमचा सहकलाकार आहे म्हणून तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकत नाही. मी यापूर्वी अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. मला वाटतं जेव्हा तुम्हाला एखाद्यासाठी काहीतरी वाटतं ते खूप वैयक्तिक असतं. तो काय करतोय याच्याशी प्रेमाचा काहीही संबंध नाही. मला म्हणायचे आहे की प्रेम हे बघून होत नाही.” तमन्नाच्या या उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंदी झाली होती. तमन्नाचे चाहते तिच्या रिलेशनशिप बाबत खूश आहेत. तमन्ना व विजय लस्ट स्टोरीज् 2 मध्ये किसिंग सीन (Tamanna Kissing Scene) देताना दिसले. तमन्नाने पहिल्यांदा नो किसिंग पॉलिसी मोडली होती.

 

 

 

अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) हीने दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली आहे.
तिच्या अभिनय कौशल्य़ामुळे तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
सुपरहिट ‘बाहुबली’ चित्रपटातील (Bahubali Movie)
तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
त्याचबरोबर तिने बॉलीवुडमध्ये (Bollywood News) आपली ओळख निर्माण केली आहे.
ओटीटीवरही तमन्ना धुमाकूळ घालत आहे. तमन्ना लवकरच भोला शंकर (Bhola Shankar)
व जेलर (Jailer) या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

 

 

Web Title : Tamanna Bhatia | tamannaah bhatia vijay verma affair was a publicity stunt for lust stories 2 here is the truth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts