Maharashtra Cabinet | ‘…ही एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका’, खातेवाटपानंतर काँग्रेस नेत्याचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet | शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपविधीला जवळपास दोन आठवडे होत आले तरी खातेवाटप (Maharashtra Cabinet) करण्यात आले नव्हते. अखेर आज खातेवाटप झालं. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते (Finance Minister) देण्यात आलं. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाच्या आमदारांनी मविआ मधून बाहेर पडताना अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदावर आक्षेप घेतला होता.

 

अजित पवार निधी देत नाहीत, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीमधून (Mahavikas Aghadi) बाहेर पडल्याचा दावा शिंदे गटाच्या आमदारांनी (Shinde Group MLA) केला होता. असं असूनही आता अजित पवार यांना सरकारमध्ये अर्थमंत्रीपद देण्यात आले आहे. यावरुन काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Congress Leader Yashomati Thakur) यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्या टोल नाक्यावर थांबावं लागलं, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

 

 

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात म्हणून महाराष्ट्राची हद्द ओलांडून सुरत मार्गे गुवाहाटी-गोवा राज्यात पोहोचलेल्या शिंदेगटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं ही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका आहे. शिंदे यांचे राजकीय अस्तित्व फार दिवसाचं नाही हेच आज सिद्ध झाले. हिवाळी अधिवेशनात (Winter Session) एकनाथ शिंदे नसतील हे आज स्पष्ट झालंय.

 

जखमेवर मीठ चोळून खातं दिलं – एकनाथ खडसे

खातेवाटपावर (Maharashtra Cabinet) भाष्य करताना राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Khadse) म्हणाले,
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले होते. त्यांचा अजित पवारांवर आक्षेप होता. अजित पवार अर्थमंत्री असताना निधी देत नाहीत,
त्यामुळे आमच्यावर अन्याय होतोय, असा आक्षेप शिंदे गटाच्या आमदारांचा होता. मात्र, आता अजित पवारांकडेच अर्थखाते आलं आहे.
मला वाटतं की एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार अजित पवारांवर नाराज होते, या नाराज आमदारांच्या जखमेवर मीठ चोळून हे खातं अजित पवारांकडे दिल्याचे दिसत आहे, असा टोला खडसे यांनी लगावला.

 

 

Web Title :  Maharashtra Cabinet | congress leader yashomati thakur criticized
eknath shinde about ajit pawar got finance department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा